ETV Bharat / state

अमरावतीत कापूस पणन महासंघाच्या ग्रेडरने फसवणूक केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

वरुड येथील अभिषेक कॉट फायबर व वरुड येथे सातपुडा कॉटन येथे शेतकऱ्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यात कापूस विक्रीसाठी नेला असता कापसाच्या विक्री पावतीवर या केंद्रावर नेमलेल्या ग्रेडरने कोणताही भाव न टाकता शेतकऱ्यांच्या कोऱ्या फोल्डरवर सह्या घेतल्या व वजन काट्याची पावती दिली. शेतकऱ्यांनी भावाबाबत ग्रेडरला विचारणा केली असता ५ हजार ३५५ रुपये भाव लावल्याचे सांगितले. मात्र, याप्रमाणे भाव मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

अमरावती कापूस उत्पादक शेतकरी न्यूज
अमरावती कापूस उत्पादक शेतकरी न्यूज
author img

By

Published : Sep 17, 2020, 12:59 PM IST

Updated : Sep 17, 2020, 5:46 PM IST

अमरावती - कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा संपता संपत नाही. कपाशी पिकविताना कष्ट आणि विकल्यानंतर मनस्ताप सहन करावा लागत आहे. वरुड येथील अभिषेक कॉट फायबर व वरुड येथे सातपुडा कॉटन येथे शेतकऱ्यांना कापूर खरेदी करताना सांगण्यात आलेला भाव प्रत्यक्षात मिळाला नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. उलट, कापूस खरेदीवेळी केंद्रावरील ग्रेडर कोऱ्या फोल्डरवर शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन वजन काट्याची पावती दिल्याचेही समोर आले आहे.

कापूस पणन महासंघाच्या ग्रेडरने फसवणूक केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रावर रांगेत थांबून रात्र-रात्र जागून कापसाची विक्री केली. मात्र, कापूस विकल्यानंतर या शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार अमरावतीच्या वरुड तालुक्यात समोर आला आहे. वरुड येथील अभिषेक कॉट फायबर व वरुड येथे सातपुडा कॉटन येथे शेतकऱ्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यात कापूस विक्रीसाठी नेला असता कापसाच्या विक्री पावतीवर या केंद्रावर नेमलेल्या ग्रेडरने कोणताही भाव न टाकता शेतकऱ्यांच्या कोऱ्या फोल्डरवर सह्या घेतल्या व वजन काट्याची पावती दिली. शेतकऱ्यांनी भावाबाबत ग्रेडरला विचारणा केली असता ५ हजार ३५५ रुपये भाव लावला असून फोल्डर रात्री भरण्यात येईल, असे सांगितल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - मेळघाटात गिर्यारोहकांनी वाचवले पुरात अडकलेल्या पर्यटकांचे प्राण

विक्री केंद्रावर कापूस विकताना शेतकऱ्याना कापसाची प्रतवारी व आर्द्रता ही माहिती देऊन भाव सांगणे बंधनकारक आहे. तो शेतकऱ्यांचा हक्क आहे. जूनमध्ये विकलेल्या कापसाचे पैसे सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले, खात्यात जमा झालेले कपाशीचे पैसे आणि त्यांना सांगण्यात आलेला हमीभाव यामध्ये प्रती क्विंटल १०० ते २०० रुपयांची तफावत दिसून येत आहे. प्रत्यक्ष या केंद्रावर कापूस विकताना ग्रेडर व इतर कापूस पणन महासंघाच्या कर्मचाऱ्यांनी कापसाच्या ग्रेडबाबत, आर्द्रतेबाबत शेतकऱ्यांना काहीही सांगितले नाही. कापसाची प्रतवारी चांगली असूनही शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन व प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी पावती आणि फोल्डरवर भाव न लिहिता शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कापूस खरेदी केंद्रावर नेमण्यात आलेले ग्रेडर जिल्हा कृषी अधिकारी यांचे कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी यांनी नेमले आहेत.

काही शेतकऱ्यांनी पणन महासंघाकडून फोल्डरची वजन प्रत व पावतीचा नमुना फॉर्म क्र. १ची माहिती मिळवली असता त्यामध्ये कापसाची आर्द्रता दाखवून पैसे कापल्याचे दिसत आहे. कापूस महासंघाने प्रत्यक्षात मात्र चांगल्या प्रतीचा कापूस असूनही हमीभावापेक्षा कमी रक्कम देऊन शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत प्रत्यक्ष चौकशी करून शेतकऱ्यांना आधारभूत किंमत ५ हजार ३५५ का मिळाली नाही, अशी विचारणा विवेक भोजने, अशोक श्रीखंडे, सूरज श्रीखंडे, रामकृष्ण बेहेरे, सुरेश खवले, संजय सुने, विजय नालट या शेतकऱ्यांनी तहसीलदार व कृषी उत्पन्न बाजार समितीकडे लेखी तक्रार देऊन केली आहे.

हेही वाचा - निर्यातबंदी ही बेईमानी नाही तर काय? बच्चू कडूंचा पंतप्रधानांना प्रश्न

शेतकऱ्यांनी जरुड आणि वरुड येथे नेमलेल्या ग्रेडरच्या तक्रारी केल्या असून याबाबत दोन्ही ग्रेडरना खुलासा मागिलता आहे. खुलाशानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे जिल्ह्यातील राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाचे विभागीय व्यवस्थापक डी. यू. कांबळे यांनी म्हटले आहे.

Last Updated : Sep 17, 2020, 5:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.