ETV Bharat / state

Farmer Dies Due to Electric Shock : विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू, दर्यापूर तालुक्यातील घटना - Shalikram Nandane

माहुली धांडे ( Mahuli Dhande In Daryapur ) येथील शालिकराम गुलाबराव नांदने (वय ६०) ( Shalikram Nandane ) यांचा रविवारी दुपारी विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू ( Farmer dies due to electric shock ) झाला. या घटनेमुळे माहुली धांडे व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Farmer Dies To Electric Shock
विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
author img

By

Published : Jul 24, 2022, 8:44 PM IST

अमरावती - दर्यापूर तालुक्यातील माहुली धांडे ( Mahuli Dhande In Daryapur ) येथील शालिकराम गुलाबराव नांदने (वय ६०) ( Shalikram Nandane ) यांचा रविवारी दुपारी विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू ( Farmer dies due to electric shock ) झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

शेतात पाहणी करताना घडला अनुचित प्रसंग - दर्यापूर पोलिस ठाण्यात ( Daryapur Police Station ) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माहुली धांडे येथील प्रगतीशील शेतकरी शालिकराम गुलाबराव नांदने हे अकोला रोडवरील संत गाडगेबाबा सुतगिरणीच्या ( Sant Gadgebaba Sutagirni ) मागे असलेल्या भरत शुक्ला यांच्या शेतात पाहणी करायला गेले असता विजेचा शॉक लागून ते जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडले होते. तेथे असलेल्या एका शेतकऱ्यांला ते बेशुद्ध अवस्थेत दिसले. यानंतर आजूबाजूला राहणाऱ्या शेतकऱ्यांनी धाव घेऊन पोलिसांना पाचारण केले. दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह दर्यापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा - Ludhiana Central Jail Clashes : लुधियाना मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी, दोन जखमी

कर्त्या पुरुषाच्या मृत्यूमुळे हळहळ - मृत शालिकराम गुलाबराव नांदने हे घरातील कर्ते पुरुष होते. परिवाराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. या घटनेमुळे माहुली धांडे व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण औटे, रमेश बुजाडे, आदिनाथ खाडे करीत आहेत.

हेही वाचा - Partha Chatterjee : पार्थ चॅटर्जी प्रकरणी ईडीने दाखल केली नवी याचिका, अर्पिता मुखर्जीला एक दिवस ईडी कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.