ETV Bharat / state

अमरावतीध्ये शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या; गावकऱ्यांनी मृतदेह ठेवला जिल्हाधिकारी कार्यालया समोर - farmer suicide amravati

सततच्या नापिकीमुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली आहे. सिद्ध नागपूर येथील ग्रामस्थांनी त्यांना मदत करावी या उद्देशाने शेतकऱ्याचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणून ठेवला होता. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यावर कर्जही असल्याची माहिती मिळत आहे.

गावकऱ्यांनी सुधाकर महादेवराव पाटेकर यांचा मृतदेह ठेवला जिल्हाधिकारी कार्यालयात
author img

By

Published : Nov 14, 2019, 3:12 PM IST

अमरावती - सततच्या नापिकीमुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली आहे. सिद्धनाथपूर येथील ग्रामस्थांनी त्यांना मदत करावी या उद्देशाने शेतकऱ्याचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणून ठेवला होता. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यावर कर्जही असल्याची माहिती मिळत आहे.

अमरावतीध्ये शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या; गावकऱ्यांनी मृतदेह ठेवला जिल्हाधिकारी कार्यालयात

हेही वाचा - 'बाजार समित्या बरखास्तीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या गळ्यात फास'

सुधाकर महादेवराव पाटेकर (वय-47) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 13 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता सुधाकर पाटेकर यांनी शेतात जाऊन विष पिऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. यावर्षी त्यांनी त्यांच्या तीन एकर शेतामध्ये सोयाबीन पेरली होती. पावसामुळे त्यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक पुर्णपणे वाया गेली. म्हणून जवळ पैसे नसल्याने मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न कसे करावे? अशा विवंचनेत सुधाकर पाटेकर होते.

दरम्यान, महिनाभरातच त्यांच्या आई आणि वडिलांचे निधन झाले, यामुळेही ते त्रासले होते. शेतीसाठी घेतलेल्या बँकेच्या कर्जाचे डोंगर वाढत असताना आता नेमके काय होणार याची कुठलीही शाश्वती नसल्याने आणि शासनाकडून अजुनही मदत मिळाली नाही. त्यामुळे सुधाकर पाटेकर यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

शासनाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी सिद्ध नाथपूर येथील ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा - 'महाराष्ट्राच्या जनतेचे नुकसान आमच्यामुळे नाही; शिवसेनेने निवडणुकीनंतर मागण्या वाढवल्या'

Intro:सततची नापिकी आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे आयुष्य उध्वस्त झाल्याच्या भावनेतून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येणाऱ्या सिद्धनायपूर येथील शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. शेतकऱ्यांवर संकट कोसळत असताना शासनाने त्यांना मदत करावी या उद्देशाने सिद्ध नागपूर येथील ग्रामस्थांनी शेतकऱ्यांचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणून ठेवला.

Body:सुधाकर महादेवराव पाटेकर (47) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 13 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता सुधाकर पाटेकर यांनी शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या वर्षी त्यांनी त्यांच्या तीन एकर शेतामध्ये सोयाबीन पेरले होते. अवकाळी पावसामुळे त्यांच्या शेतातील सोयाबीन खराब झाले. आता जवळ पैसा नसल्याने आणि शेतात एकही नसल्याने मुलांचे शिक्षण मुलीचे लग्न कसे करावे अशा विवंचनेत सुधाकर पाटेकर होते दरम्यान महिनाभरातच त्यांच्या आई आणि वडिलांचे निधन झाले यामुळेही ते विवंचनेत होते. शेतीसाठी घेतलेल्या बँकेच्या कर्जाचे डोंगर वाढत असताना आता नेमके काय होणार याची कुठलीही शाश्वती नसल्याने आणि शासनाकडून मदत मिळण्याची अपेक्षा नसल्याने सुधाकर पाटेकर यांनी आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
शासनाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी सिद्ध नागपूर येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.