ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, वीज कोसळल्याने युवा शेतमजुराचा मृत्यू - etv marathi

राज्यात मागील महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती मागील आठवडाभरापासून पावसाने उसंत दिली असताना शनिवारी (दि. 16 ऑक्टोबर) जिल्ह्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतात काम करत असलेल्या युवा शेतमजुराचा वीज कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना धामणगाव रेल्वे तालुक्यातील आजणगाव शेतशिवारात घडली आहे. किरण थाळे (वय 24 वर्षे), असे मृत शेतमजुराचे नाव आहे.

मृत शेतमजूर
मृत शेतमजूर
author img

By

Published : Oct 16, 2021, 6:55 PM IST

Updated : Oct 16, 2021, 7:46 PM IST

अमरावती - राज्यात मागील महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती मागील आठवडाभरापासून पावसाने उसंत दिली असताना शनिवारी (दि. 16 ऑक्टोबर) जिल्ह्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतात काम करत असलेल्या युवा शेतमजुराचा वीज कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना धामणगाव रेल्वे तालुक्यातील आजणगाव शेतशिवारात घडली आहे. किरण थाळे (वय 24 वर्षे), असे मृत शेतमजुराचे नाव आहे. आज मंगेश लंबळी यांच्या शेतात सोयाबीन काढण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक पाऊस आल्याने त्याने सोयाबीन झाकण्यासाठी तो ताडपत्री आणत होता. त्याचवेळी अचानक वीज कोसळल्याने किरण गतप्राण झाला. अचानक झालेल्या किरणच्या या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या किरणचा मृतदेह धामणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला आहे.

वीज कोसळल्याने युवा शेतमजुराचा मृत्यू

अनेक शेतकऱ्यांचा कापूस झाला ओला

जिल्ह्यातील दर्यापूर, अंजनगाव, पथरोट, अचलपूर, परतवाडा, मेळघाट आदी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी साडेतीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटात पावसाची सुरुवात झाली. सुमारे पावणेदोन तास बरसलेल्या पावसाने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. मागील आठवड्यात झालेल्या पावसाने संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. आज झालेल्या पावसाने पूर्ववत झालेली संत्राची वाहतूक पांदन रस्त्यांमुळे विस्कळीत झाली आहे. दसऱ्यानंतर कापूस वेचणीचा हंगाम सुरू होतो. दसऱ्याच्या मुहूर्तावर आणि त्यांनी कापूस वेचणीचा शुभारंभ केला. मात्र, आज झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कापूस ओला झाला आहे.

हेही वाचा - विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात : अंबिया बहारातील संत्रा बागांना गळती; भावही कोसळले

Last Updated : Oct 16, 2021, 7:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.