ETV Bharat / state

पेरलेले बियाणे न उगवल्याने आमदारांकडून शेताचा आढावा; गरज पडल्यास पंचनामे करणार

author img

By

Published : Jun 24, 2020, 5:32 PM IST

चांदूर रेल्वे तालुक्यात बरसलेल्या पावसामुळे जवळपास 70 टक्के पेरणी आटोपली आहे. मात्र, अनेक भागांत पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यासंबंधी तक्रारी प्राप्त झाल्याने आमदार प्रताप अडसड यांनी चांदूर रेल्वे तालुक्यातील काही शेतांची पाहणी केली.

pratap adsad news
पेरलेलं बियाणं न उगवल्याने आमदारांकडून शेताचा आढावा; गरज पडल्यास पंचनामे करणार

अमरावती - चांदूर रेल्वे तालुक्यात बरसलेल्या पावसामुळे जवळपास 70 टक्के पेरणी आटोपली आहे. मात्र, अनेक भागांत पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यासंबंधी तक्रारी प्राप्त झाल्याने आमदार प्रताप अडसड यांनी चांदूर रेल्वे तालुक्यातील काही शेतांची पाहणी केली. त्यावेळी काही ठिकाणी पाणी न आल्याने, तर काही ठिकाणी बियाणांमधील उगवण शक्ती कमी असल्याने हे बियाणे उगवले नसल्याचे आढळले.

यासंदर्भात अनेक तक्रारी आल्यामुळे शेतांची त्वरित पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना तत्काळ मदत पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शेतकऱ्यांनी वेळ न घालवता तत्काळ कृषी अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच आपल्यालाही सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार कळवल्यास त्याचा पाठपुरवठा करणार असल्याचे आमदार प्रताप अडसड यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.