अमरावती - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रा.सु. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या संस्थेत कौटुंबिक कलह उफाळून आला आहे. रा.सु. गवई यांचे धाकटे पुत्र डॉ. राजेंद्र गवई यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आई कमलताई गवई यांच्यासह बहीण, जावई आणि दोन भाच्यांविरुद्ध न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.
डॉ. राजेंद्र गवईं यांची प्रतिक्रिया स्व. दादासाहेब गवई यांनी स्थापन केलेल्या श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टमध्ये सध्या दादासाहेब गवई यांची मुलगी कीर्ती अर्जुन या अध्यक्ष आहेत. या संस्थेचे कोषाध्यक्षपद जावई राजेश अर्जुन यांच्याकडे असून दादासाहेब गवई यांचा नातू धर्म राजेश अर्जुन हे उपाध्यक्ष आहे, तर दुसरा नातू करण राजेश अर्जुन यांच्यासह पत्नी कमलताई गवई धाकटा मुलगा राजेंद्र गवई आणि रूपचंद खंडेलवाल हे सदस्य आहेत. दरम्यान सोमवारी संस्थेचे सदस्य डॉ. राजेंद्र गवई यांनी या संस्थेत मी आणि रूपचंद खंडेलवाल हे केवळ नाममात्र सदस्य आहोत. संस्थेत नेमके काय सुरू आहे, याची कल्पना आम्हाला दिली जात नाही. हा आमच्यावर अन्याय आल्याचे म्हटले आहे.
डॉ. राजेंद्र गावई यांचे आरोपमाझे वडील दादासाहेब गवई यांची ही नामांकित संस्था असून संस्थेच्या दारापूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयासह एकूण 47 शाळा महाविद्यालय आहेत. आमच्याकडे कधीही वाद झाला नाही. दादासाहेब म्हणतील त्या कागदावर आम्ही सगळे अगदी डोळे मिटून स्वाक्षरी करायचो. पुर्वी या संस्थेचे अध्यक्षपद आमच्या आईसाहेबांकडे होते. त्यानंतर माझा भाचा कारण अर्जुन यास अध्यक्षपद देण्यात आले. त्याचवेळी संस्थेचे सचिव बाळासाहेब लढाऊ यांचा राजीनामा घेण्यात आला. तर व.पू. राऊत यांचा सदस्य पदाचा राजीनामा घेण्यात आला. भाच्याच्या हाताखाली काम करायची मला कुठलीही लाज नाही, असे मी आईसाहेबांना वारंवार सांगितले. मात्र, माझा म्हणण्याकडे आई आणि संस्थेवर आपला अधिकार गाजविणाऱ्या अर्जुन कुटुंबातील सदस्यांनी माझ्याकडे साफ दुर्लक्ष केले. इतकेच नाही तर मी सांगितलेल्या एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश न देणे, मी सांगितलेल्या व्यक्तीला संस्थेत नौकरी न देणे हा प्रकार सुरू झाला. आता तर मला संस्थेच्या कुठल्याही कामाची माहिती दिली जात नाही. माझ्यासह रुपचंद खंडेलवाल यांनाही कुठलेही अधिकार नाही. गत सात वर्षांपासून संस्थेत असूनही आपल्याला महत्व दिले जात नसल्याने याचा परिणाम 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीचा उमेद्वार म्हणून झाला. लोकांना वाटते ही संस्था माझी आणि मी त्यांच्या मुलांची साधी ऍडमिशनही करू शकत नाही. याचाच फटका मला सहन करावा लागला, असे डॉ. राजेंद्र गवई म्हणाले. माझा संस्थेमुळे मला निवडणुकीत पराभूत व्हावे लागले. असा आरोप डॉ. राजेंद्र गवई यांनी केला आहे.
काय आहे डॉ. राजेंद्र गवई यांच्या उद्रेकाचे कारणदारापूर येथील संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यातील 80 जणांचा पगार गत 11 महिन्यांपासून झाला नाही. पगाराविना अडचणीत असलेल्या कर्मचऱ्यांनी त्यांच्या जीवाचे बरे-वाईट केले, तर अध्यक्षांसाह संस्थेतील सर्व पदाधिकारी कारागृहात जाऊ शकतात. माझ्यावर अन्याय होत असताना मी चूप आहे. मात्र, माझा कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय मी सहन करणार नाही. कर्मचाऱ्यांनी संस्थेविरुद्ध आंदोलन छेडले, तर मी कर्मचार्यांसोबत आंदोलनात सहभागी होणार. संस्थेविरोधात कर्मचारी जर न्यायालयात गेले, तर मी त्यांच्यासोबत न्यायलयात जाणार, अशी भूमिका डॉ. राजेंद्र गवई यांनी जाहीर केली.