ETV Bharat / state

10th Exams Information : दहावीच्या परीक्षांचे ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी 25 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ - class 10th exams

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षेची (class 10th exams) नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डेटाबेसवरुन ऑनलाईन (fill online application forms) भरण्यासाठी 25 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ (Extension of time till November 25) देण्यात आली आहे. 10th Exams Information

10th Exams Information
दहावीच्या परीक्षांचे ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी मुदतवाढ
author img

By

Published : Nov 5, 2022, 2:06 PM IST

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षेची (class 10th exams) नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डेटाबेसवरुन ऑनलाईन भरावयाची मुदत दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी संपत आहे. मात्र विद्यार्थी हिताच्यादृष्टीने ऑनलाईन परीक्षा आवेदपत्रे (fill online application forms) भरण्यासाठी 25 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ (Extension of time till November 25) देण्यात आली आहे. 10th Exams Information

11 ते 15 नोव्हेंबर पर्यंत भरता येणार फॉर्म : आवेदनपत्रे प्रचलित ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखा पुढीलप्रमाणे आहे. माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची तसेच पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेवून, आयटीआय (ऑद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (Transfer of Credit) घेणारे विद्यार्थी) आदींची आवेदनपत्रे सरल डाटाबेसवरुन ऑनलाईन पध्दतीने दिनांक 11 ते 25 नोव्हेंबर दरम्यान भरावीत. माध्यमिक शाळांनी दिनांक 29 नोव्हेंबरपर्यंत चलनाद्वारे बँकेत शुल्क भरावे.

शाळा लॉगीनमधून प्रीलिस्ट उपलब्ध : आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांनी, सर्व विद्यार्थ्यांची आवेदपत्रे भरुन सबमीट केल्यानंतर त्यांना शाळा लॉगीनमधून प्रीलिस्ट उपलब्ध करुन दिलेली असेल. शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रातील नमूद केलेली माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळणी करुन; अचूक असल्याची खात्री करावी. त्याबाबत प्रीलिस्टवर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी, त्यानंतर सदर प्रीलिस्ट चलनासोबत विभागीय मंडळात जमा करावी.

मंडळाचे विभागीय सचिव उल्हास गरड यांची माहिती : माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रीलिस्ट जमा करावयाची तारीख गुरुवार दिनांक 1 डिसेंबर 2022 अशी राहील. इयत्ता 10 वीच्या परीक्षेची आवेदपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने, विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी विभागीय मंडळाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सचिव उल्हास गरड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. 10th Exams Information

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.