ETV Bharat / state

Exam Fever 2022 : दोन वर्षानंतर अमरावती विद्यापीठाची परीक्षा; 50 टक्केच प्रश्न सोडविण्याची मुभा - संत गाडगेबाबा उन्हाळी परीक्षा

सत्र पद्धतीतील सम सत्राच्या सर्व विद्यार्थ्यांच्या उन्हाळी 2022 परीक्षा ( Summer 2022 Examinations  ) या कोरोनापूर्वीच्या प्रचलित पद्धतीने विद्यापीठाद्वारे वेळापत्रक जाहीर करून संचालित करण्यात येणार आहेत. ही माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे परीक्षा ( Sent Gadgebaba university ) व मूल्यमापन केंद्राचे संचालक डॉ. हेमंत देशमुख ( Dr Hemant Deshmukh on summer exams ) यांनी' ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

संत गाडगेबाबा विद्यापीठ
संत गाडगेबाबा विद्यापीठ
author img

By

Published : Apr 19, 2022, 4:17 PM IST

अमरावती - कोरोनामुळे सलग दोन वर्षे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा ( Exam Fever 2022 ) ऑनलाइन घेण्यात आल्या होत्या. यावर्षी मात्र उन्हाळी 2022 च्या परीक्षा ऑफलाइन घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पन्नास टक्केच प्रश्न या वर्षी सोडविण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी पूर्वीप्रमाणेच वेळ असणार आहे. उन्हाळी 2022 च्या परीक्षा 27 एप्रिलपासून सुरू ( Amaravati university exam ) होणार आहेत.

अशी आहे परीक्षा पद्धत- सत्र पद्धतीतील सम सत्राच्या सर्व विद्यार्थ्यांच्या उन्हाळी 2022 परीक्षा ( Summer 2022 Examinations ) या कोरोनापूर्वीच्या प्रचलित पद्धतीने विद्यापीठाद्वारे वेळापत्रक जाहीर करून संचालित करण्यात येणार आहेत. वार्षिक पद्धतीतील अभ्यासक्रमांना अनेक विद्यार्थ्यांनी नियमित पद्धतीने प्रवेश घेतला आहे. अशा अभ्यासक्रमाच्या सर्व वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांच्या उन्हाळी 2022 परीक्षा या पूर्वीच्या प्रचलित पद्धतीने विद्यापीठाद्वारे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. ही माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे परीक्षा ( Sent Gadgebaba university ) व मूल्यमापन केंद्राचे संचालक डॉ. हेमंत देशमुख ( Dr Hemant Deshmukh on summer exams ) यांनी' ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

अशी सोडवायची आहे उत्तर पत्रिका- विद्यापीठ अभ्यासक्रमातील सर्वच शाखेच्या प्रश्नपत्रिकेत असलेल्या एकूण प्रश्नांच्या 50 टक्के प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचे आहेत. जर 50 टक्के प्रश्न अपूर्णांकात येत असतील तर पुढच्या क्रमांका इतके प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचे आहेत. याबाबत डॉक्टर हेमंत देशमुख म्हणाले, की प्रश्नपत्रिकेत एकूण सात प्रश्न असतील तर त्याच्या 50 टक्के प्रश्न 3.5 टक्के येथे होतात. अशा वेळी विद्यार्थ्यांनी एकूण चार प्रश्न सोडवायचे आहेत. तशा सूचना विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रावर देण्यात येणार आहेत. परीक्षेत विद्यार्थ्यांना 50 टक्के प्रश्न सोडवायचे असल्याने त्यांना परीक्षेच्या वेळी पुरवणी उत्तर देण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

असे असणार परीक्षा केंद्र- उन्हाळी 2022 परीक्षेकरिता कोरोना 2019 पूर्वी असलेली मान्यता प्राप्त परीक्षा केंद्र हेच परीक्षा केंद्र राहणार आहेत. विद्यार्थ्यांकरीता वीस किलोमीटरच्या आत परीक्षा केंद्र नसल्यास विशेष बाब म्हणून केवळ उन्हाळी 2022 परीक्षेकरिता प्रचलित पद्धतीने परीक्षा केंद्र देण्यात येतील. प्रत्येक परीक्षा केंद्रावर प्रचलित पद्धतीने परीक्षा केंद्र अधिकारी राहणार आहे. या केंद्रावर सहल केंद्र आधिकारी सुद्धा प्रचलित पद्धतीने नियुक्त करण्यात येणार आहे. सर्व परीक्षांचे मूल्यांकन हे विद्यापीठात केले जाणार आहे.

हेही वाचा-Mumbai University summer session exam : मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेच्या तारखा जाहीर
हेही वाचा-Job in RBI : वैद्यकीय सल्लागाराच्या रिक्त जागांवर थेट मुलाखतीद्वारे होणार निवड
हेही वाचा- Indian Army recruitment 2022; दहावी-बारावी पास उमेदवारांकरिता भारतीय सैन्यदलात 'या' पदाकरिता संधी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.