ETV Bharat / state

Akansha Thakur Appeal To Anil Bonde : मामा, अमरावतीतल्या तरुणांना बिघडवू नका, यशोमती ठाकुरांच्या मुलीची अनिल बोंडेंना भावनिक साद

अनिल बोंडे ( Anil Bonde ) मामा अमरावतीतील सुजाण नवतरुणांना बिघडवण्याचा प्रयत्न करू नका, आम्हाला भारताला सुपर पॉवर झालेले बघायचे आहे, असे आवाहन तिवसा विधानसभा मतदारसंघ युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा आकांक्षा ठाकूर ( Akansha Thakur Appeal To Anil Bonde ) हिने केले आहे.

Akansha Thakur Appeal To Anil Bonde
Akansha Thakur Appeal To Anil Bonde
author img

By

Published : Apr 20, 2022, 10:35 PM IST

Updated : Apr 20, 2022, 10:51 PM IST

अमरावती - अमरावती जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची ( Amravati Law And Order ) परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनिल बोंडे ( Anil Bonde ) मामा अमरावतीतील सुजाण नवतरुणांना बिघडवण्याचा प्रयत्न करू नका, आम्हाला भारताला सुपर पॉवर झालेले बघायचे आहे, असे आवाहन तिवसा विधानसभा मतदारसंघ युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा आकांक्षा ठाकूर ( Akansha Thakur Appeal To Anil Bonde ) हिने केले आहे.

प्रतिक्रिया

'भारताला सुपर पवार बनवायचे आहे' - भाजपचे माजी आमदार अनिल बोंडे यांनी स्वतःच्या मुलांना परदेशात पाठवून इथल्या तरुणांची माथी भडकवण्याचे काम करू नये. आम्हाला येथे शांतता आणि प्रगती हवी आहे. आम्हाला भारताला सुपर पॉवर झालेले बघायचे आहे आणि भारताचा हॅपिनेस इंडेक्स वाढलेला बघायचे आहे. आम्हाला शांततेत जगू द्या आणि अमरावतीच्या आणि राज्याच्या विकासाला हातभार लागू द्या, असे आवाहनही आकांशा यांनी केले आहे.

अनिल बोंडे यांच्या विरोधात रोष - अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजप नेते डॉ. अनिल बोंडे हे गत काही दिवसांपासून काँग्रेससह राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात टिप्पणी करीत असल्यामुळे त्यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसैनिकांमध्ये रोष व्यक्त होतो आहे. मंगळवारी डॉ. अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्ह्यात घडणाऱ्या दंगलीमागे जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर या मास्टरमाइंड असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता यशोमती ठाकूर यांच्या कन्या आकांक्षा ठाकूर यांनी त्यांना समाजात तेढ निर्माण करू नये, यासाठी भावनिक आवाहन केले आहे.

हेही वाच - Hanuman Chalisa Issue : राणा दाम्पत्य 23 एप्रिलला मातोश्रीवर करणार 'हनुमान चालीसा पठण'

Last Updated : Apr 20, 2022, 10:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.