ETV Bharat / state

अमरावती : बोराळ्यात डीपी भडकल्याने भीषण आग; जीवितहानी नाही - बोराळ्यात डीपी भडकल्याने भीषण आग

बोराळ्यात डीपी भडकल्याने भीषण आग लागल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी २ वाजता घडली. अचानक आगीचा भड़का उडाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे जीवित व वित्तहानी टळली.

electric dp fire in borala village in amravati district
अमरावती : बोराळ्यात डीपी भडकल्याने भीषण आग; जीवितहानी नाही
author img

By

Published : May 21, 2021, 7:43 PM IST

अमरावती - भर उन्हात डीपी भडकल्याने बोराळ्यात भीषण आग लागल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी २ वाजता घडली. अचानक आगीचा भड़का उडाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे जीवित व वित्तहानी टळली. अनेकांनी पाण्याच्या बादल्या आणि पोहऱ्यात पाणी घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. याबाबत वीज वितरण कंपनीकडे तक्रार करून ही दखल न घेतल्याने अभियंत्याविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संताप होता.

बादल्याने पाणी टाकून आगीवर नियंत्रण -

दर्यापूर तालुक्यातील बोराळा (आराळा) येथे आज दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक डीपीमधून आगीचे गोळे बाहेर पडायला सुरुवात झाली. काही कळायच्या आतच आगीचा भड़का उडाला होता. डीपीच्या बाजूला इंधनासाठी सुकलेल्या पराट्या टाकलेल्या असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी डीपीच्या दिशेने धाव घेतली. तातडीने प्रत्येक व्यक्ती पाण्याच्या बादल्या, गुंड आणि पोहऱ्यातील पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळविले.

वीज वितरण केंद्राच्या उपअभियंत्याविरुद्ध तीव्र संताप -

तब्बल दोन तासाच्या शर्थिच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेमुळे ग्रामस्थांनी खोलापूर येथील वीज वितरण केंद्राच्या उपअभियंत्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. आमच्या गावात डीपीवर भार वाढत आहे. त्यामुळे भविष्यात दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, आपण वेळीच लक्ष्य देऊन डीपीवरील वाढलेला भार कमी करण्यात यावा, अशी वीज वितरण कंपनीकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याने संबंधित उपअभियंत्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.

हेही वाचा - बीडमध्ये कोरोनाबाधिताची आत्महत्या; गळफास घेत संपविले जीवन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.