ETV Bharat / state

शासनाच्या आदेशाला निवडणूक विभागानेच दाखवली केराची टोपली - अमरावती कोरोना न्यूज

राज्यभर कोरोनाचे सावट असल्याने गर्दीच्या मेळाव्यांना आणि मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांना शासनाने बंदी घातली आहे. मात्र, असे असतानाही अमरावतीमध्ये निवडणूक प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला हजारो कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली.

Election Training
निवडणूक प्रशिक्षण मेळावा
author img

By

Published : Mar 15, 2020, 1:04 PM IST

अमरावती - कोरोना विषाणूने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. राज्यात कोरोनाचे 32 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने सरकारी, खासगी शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, सिनेमागृह, मॉल आणि सार्वजनिक कार्यक्रम ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अमरावतीत ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भातकुली आणि अमरावती तालुक्यांतर्गत हजारो कर्मचाऱ्यांना एकत्र प्रशिक्षण देण्यात आले. शासनाच्या आदेशाला निवडणूक विभागाने केराची टोपली दाखवल्याचा प्रकार झाला.

शासनाच्या आदेशाला निवडणूक विभागानेच दाखवली केराची टोपली

देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आढळून आले आहेत. त्यामुळे सरकारकडून खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मार्च महिन्यात राज्यातील १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यात अमरावती जिल्ह्यातील ५२६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. येत्या २९ तारखेला या निवडणुका पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात भातकुली आणि अमरावती तालुक्यातील हजारो शासकीय कर्मचारी उपस्थित राहिले.

हेही वाचा - COVID-19 LIVE : राज्यात आढळला नवा रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३२ वर

राज्यभर कोरोनाचे सावट असल्याने गर्दीच्या मेळाव्यांना आणि मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमाला बंदी असतानाही हा कार्यक्रम घेतला गेल्याने शासनाच्या आदेशाला शासकीय अधिकाऱ्यांनीच केराची टोपली दाखवल्याचा प्रकार झाला.

उपस्थित कर्मचाऱयांना एका एलइडी स्क्रीनवर प्रशिक्षण देण्यात येत आहे. या कार्यक्रमाला जमलेली गर्दी ही कमी असून टप्प्या-टप्प्यात या प्रशिक्षण देले जात असल्याचे स्पष्टीकरण तहसीलदारांनी दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.