अमरावती : अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी तालुक्यात (Anjangaon surgi Amravati) येणाऱ्या लखाड ह्या गावात मोहम्मद नावेद उर्फ गुड्डू अब्दुल सलीम या 30 वर्षीय व्यक्तीच्या घरात तीन लोखंडी पिस्टल आणि आठ जिवंत काडतूस (Eight live cartridges and three pistols seized) अंजनगाव सुर्जी पोलिसांनी (latest news from Amravati) जप्त केल्यामुळे खळबळ (Amravati Crime) उडाली आहे. (Cartridges And Pistols Seized)
असे आहे संपूर्ण प्रकरण : अंजनगाव सुर्जी तालुक्यात येणाऱ्या लखाड या गावात वार्ड क्रमांक तीन येथे राहणाऱ्या मोहम्मद नावेद उर्फ गुड्डू अब्दुल सलीम यांच्या घरात पिस्टल आणि काडतूस असल्याची गुप्त माहिती अंजनगाव सुर्जी पोलिसांना मिळाली. गुप्त माहितीदाराने दिलेल्या माहितीवरून पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनात अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वानखडे यांच्या नेतृत्वातील पथकाने शनिवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास लखाड गावात मोहम्मद नावेद उर्फ गुड्डू अब्दुल सलीम यांच्या घरावर छापा टाकला. पोलिसांनी मोहम्मद नावे त्याच्या घराची झडती घेतली असता घराच्या स्वयंपाक खोलीत गॅस ओट्याच्या खाली मोहम्मद नावेदने तयार केलेल्या सिमेंटच्या शेगडीच्या आतमध्ये एका प्लास्टिकच्या पिशवी आढळली. यामध्ये तीन गावठी पिस्तल आणि त्यासोबत आज जिवंत काडतूस पोलिसांच्या हाती लागले.
पोलिसांनी आरोपीला केली अटक : अंजनगाव पोलिसांनी या प्रकरणात भारतीय शास्त्र अधिनियम कलम 3,25 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी मोहम्मद जावेद उर्फ गुड्डू अब्दुल सलीम याला अटक केली. या कारवाईत अंजनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उल्हास राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय शेवतकर, जयसिंग चव्हाण, विशाल थोरात, शुभम मार्कंड, देवानंद पालवे, आणि हर्षा यादव यांचा समावेश होता.