ETV Bharat / state

चांदूर रेल्वे तालुक्यातील ६८ गावांच्या भिंती झाल्या बोलक्या! शिक्षण विभागाचा अनोखा उपक्रम

author img

By

Published : Dec 14, 2020, 11:48 AM IST

कोरोनाची धास्ती कमी होत असली तरी अजूनही प्राथमिक शाळा सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत. शाळा बंद असली तरी शिक्षण सुरू या उपक्रमानुसार ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सानिध्यात ठेवण्याचे काम शिक्षण विभागाकडून होत आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील गुरुजींनी शाळा थेट विद्यार्थ्यांच्या अंगणातच पोहचवली आहे. नेमके या अनोख्या शाळेचे कामकाज कसे चालते हे पाहुया ईटीव्ही भारतच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये...

Students
विद्यार्थी

अमरावती - कोरोनाच्या काळात ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यावर भर वाढला. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये मात्र, या ऑनलाइन शिक्षणाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे परिस्थिती अभावी नसलेले अँड्रॉइड मोबाईल आणि नेटवर्कची अडचण ही त्यामागे असलेली कारणे आहेत. याही परिस्थितीत काही शिक्षकांनी अतिशय तळमळीने विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचवण्याचा प्रयत्न केला. शिक्षकांच्या मदतीला आता शासनही आले आहे.

चांदूर रेल्वे तालुक्यातील ६८ गावांमध्ये भिंतींवर पोस्टर्स लावण्यात आले आहेत

शाळा विद्यार्थ्यांच्या अंगणात -

शासनाने एक कल्पकता लढवत नव्या सूचनेनुसार शाळा विद्यार्थ्यांच्या अंगणात हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील घरांच्या भिंती बोलक्या होत आहे. या उपक्रमाअंतर्गत शाळेतील शिक्षकांच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने चांदूर रेल्वे तालुक्यातील गावांमध्ये मुख्य भिंतीवर शैक्षणिक पोस्टर लावून संपूर्ण गावालाच शाळेचे स्वरूप दिले आहे. गणित, भाषा, विज्ञान, सामाजिक शास्त्र, अशा अनेक विषयांचे पोस्टर विद्यार्थ्यांच्या दृष्टीस पडतील अशा जागेवर लावले जात आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमाने विद्यार्थ्यांसोबत गावकरीही अभ्यासाला लागले आहेत. गावात ज्या ठिकाणी विद्यार्थी खेळतात किंवा ज्या ठिकाणी जास्त रमतात, त्याच भागात शालेय पोस्टर लावल्याने खेळण्या सोबत अभ्यास ही होत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत.

जिथे विद्यार्थ्यांची वर्दळ तिथे अभ्यासासाठी पोस्टर -

चांदूर रेल्वे तालुक्यातील चांदुरवाडी गावात जिल्ह्यापरिषद शाळेचे सहाय्यक शिक्षण सचिन वावरकर सांगतात, 'शाळा विद्यार्थ्यांच्या अंगणी या उपक्रमा अंतर्गत आम्ही गावातील महत्वाच्या ठिकाणी, जिथे विद्यार्थ्यांची वरदळ राहते तिथे पोस्टर लावले आहेत. ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित,आदी विषयाच्या पोस्टरचा समावेश आहे. पोस्टर लावल्यानंतर विद्यार्थ्यांना सांगितले, की त्यांना कशा प्रकारे त्याचे वाचन करायचे आहे. वाचन केल्यानंतर ते विद्यार्थ्यांना आपल्या वहीत लिहावे लागणार आहे. हे पोस्टर गावातील शाळेच्या भिंती, अंगणवाडीच्या भिंती, घरांच्या भिंती, किराणा दुकान आदी ठिकाणी लावण्यात आले आहेत. या पोस्टरर्सवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालकांवर देण्यात आली आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.'

ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण प्रभावी नाही -

लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा अजूनही बंद आहे. त्यात ऑनलाइन शिक्षणही फारसे प्रभावी होत नाही. त्याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात 'शाळा विद्यार्थ्यांच्या अंगणात' हा उपक्रम राबण्यात आला आहे. त्यात प्रथम पुढाकार घेऊन चांदुर रेल्वे तालुक्याने काम सुरू केले आहे. तालुक्यातील ६८ शाळांमधील मुख्याध्यापकांची ऑनलाइन बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. शाळेतील पुस्तकापेक्षा विद्यार्थी भिंतीवरील पोस्टर लवकर वाचतात. त्याचाच आधार घेऊन हा उपक्रम राबवला जात असल्याचे, शिक्षण विभागातील विषय साधन व्यक्ती पदावर कार्यरत असलेल्या विवेक राऊत यांनी सांगितले.

६८ गावांमध्ये हा अनोखा उपक्रम -

शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर सांगतात, 'शासनाचे सामाजिक परिवर्तन अभियान आहे. त्याच अभियानाला अनुसरून हा उपक्रम आहे. त्यामुळे मराठी, इंग्रजी, गणितगाव असा हा उपक्रम आहे. गावातील उच्चशिक्षित तरुण या उपक्रमासाठी मदत करत आहेत. गावात भिंतीवर पोस्टर लावणे एवढीच शिक्षकांची जबाबदारी नसून गावातील विद्यार्थ्यांना याचे महत्त्व पटवून देण्यासाठी शिक्षक जनजागृती करत आहेत. चांदूर रेल्वे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ६७ शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.