ETV Bharat / state

E Registration For Construction Companies : आता बांधकाम व्यावसायिकांना घरबसल्या करता येणार करारमान्याची नोंदणी - बांधकाम कंपन्यांसाठी ई रजिस्ट्रेशन प्रक्रिया

बांधकाम व्यावसायिकांना स्वत:च्या कार्यालयात बसूनच पक्षकार व त्यांच्यात होणाऱ्या प्रथम विक्रीच्या करारमान्याची नोंदणी (E Registration For Construction Companies) करता येणे शक्य झाले आहे. त्यासाठी ऑनलाईन ई-रजिस्ट्रेशन प्रणाली नोंदणी (Online E Registration) महानिरीक्षक कार्यालयामार्फत विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीबाबत बांधकाम व्यावसायिकांची कार्यशाळा (Builders Workshop) नुकतीच नागपूर येथील चिटणीस सेंटर येथे झाली. कार्यशाळेला नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर तसेच नागपूर व अमरावती विभागातील क्रेडाईचे सदस्य, अनेक बांधकाम व्यावसायिक, अधिवक्ते, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. (Latest news from Amravati)

E Registration For Construction Companies
बांधकाम व्यावसायिक
author img

By

Published : Jan 2, 2023, 9:05 PM IST

अमरावती : घरबसल्या दस्त नोंदणीची कार्यवाही करण्यासाठी विकसित केलेली ई-रजिस्ट्रेशन प्रणाली विभागासाठी मैलाचा दगड ठरणारी आहे. (E Registration For Construction Companies) बांधकाम व्यावसायिक स्वत:च्या कार्यालयात बसूनच पक्षकार व बांधकाम व्यावसायिकांतील प्रथम विक्रीच्या करारमान्याची नोंदणी (Online E Registration) या प्रणालीमार्फत करू शकतात. (Builders Workshop) त्यासाठी नोंदणी कार्यालयात जाण्याची कुठलीही आवश्यकता नाही, असे हर्डीकर यांनी यावेळी सांगितले. (Latest news from Amravati)

नोंदणीकरिता सुलभ सुविधा : ते म्हणाले की, बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम प्रकल्पाची सर्व माहिती प्रणालीवर नोंदविणे आवश्यक आहे. ही प्रणाली 24x7 कार्यान्वित राहणार आहे. सुटीच्या दिवशीही बांधकाम व्यावसायिक दस्तऐवज नोंदवू शकतील. या प्रणालीचा वापर केवळ कार्यालयीन वेळेतच करावा असे कुठलेही बंधन नाही. बिल्डर हे त्यांच्या व पक्षकारांच्या सवडीनुसार रात्री उशिरासुध्दा या प्रणालीअंतर्गत दस्त नोंदणी करु शकतात. ही प्रणाली बिल्डर व पक्षकार यांना नोंदणी कार्यालयात दस्त नोंदणीसाठी लागणारा विलंब व दगदग कमी करणारी आहे.

बांधकाम व्यावसायिकांसाठी आवाहन : ई-रजिस्ट्रेशन हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ई-गव्हर्नन्सअंतर्गत केंद्र शासनाचा प्रथम पुरस्कार नोंदणी व मुद्रांक विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे या प्रणालीचा वापर करण्यासाठी बहुसंख्येने बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन हर्डीकर यांनी केले. प्रणालीचा वापर करताना अडचण आल्यास नोंदणी विभागाने हेल्पलाईनही तयार करण्यात आली आहे.

यांनी नोंदविला सहभाग : अनिल कपले यांनी सूत्रसंचालन केले. किशोरकुमार मगर यांनी प्रास्ताविक केले. अनिल औतकर यांनी आभार मानले. नागपूरचे नोंदणी उपमहानिरीक्षक राजेश राऊत व अमरावतीचे नोंदणी उपमहानिरीक्षक मोहन जोशी, तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी संजय तरासे, कांबळे, एंबडवार, पगार, घोंगडे आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.