अमरावती - द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्या ( Draupadi Murmu President ) आहेत. त्यानिमित्ताने मेळघाटात आदिवासी बांधवांनी जल्लोष केला. चिखलदरा तालुक्यातील कोटमी या गावात आदिवासींना नृत्य करुन जल्लोष ( Draupadi Murmu 15 President in india celebration in melghat ) केला.
आमदार राणांनी केले भोजन दान - द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्याच्या निमित्ताने बडनेराचे आमदार रवी राणा यांनी मेळघाटातील कोटणीसह लगतच्या गावातील एकून 5000 आदिवासी बांधवांना भोजनदान केलं. तसेच, मिठाईचे वाटप देखील केले. द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानिमित्त मेळघाटातील कोटमी या गावात ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. आदिवासी बांधवांसोबत आमदार रवी राणा यांनी नृत्य देखील केलं.
राष्ट्रपतींनी मेळघाटात यावे - भारताच्या नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मेळघाटला भेट द्यावी. मेळघाटातील आदिवासी बांधवांशी संवाद साधून मेळघाटाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा. तसेच, खासदार नवनीत राणांच्या प्रयत्याने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू निश्चित मेळघाटात येती, असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - Draupadi Murmu : नगरसेविका ते देशाच्या प्रथम नागरिक; वाचा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा राजकीय प्रवास