ETV Bharat / state

तपोवनात पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांचा १२८ वा जयंती उत्सव उत्साहात - विदर्भ महारोगी सेवा समिती तपोवन

अमरावतीचे भूषण असलेले 'विदर्भ महारोगी सेवा समिती तपोवन'चे संस्थापक पद्मश्री डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांचा १२८ वा जयंती उत्सव अमरावतीच्या तपोवन येथील शिव उद्यानात शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला.

amravati
पद्मश्री डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांची १२८ वी जयंती
author img

By

Published : Dec 29, 2019, 8:25 AM IST

अमरावती - स्वातंत्र्य सेनानी, थोर समाजसेवक आणि अमरावतीचे भूषण असलेले 'विदर्भ महारोगी सेवा समिती तपोवन'चे संस्थापक पद्मश्री डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांचा १२८ वा जयंती उत्सव अमरावतीच्या तपोवन येथील शिव उद्यानात शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला.

पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांची १२८ वी जयंती

तपोवन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अतुल आळशी यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्याला आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त अजय कुलकर्णी, माजी लेडी गव्हर्नर कमल गवई, अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, तपोवन संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष गवई, नियामक समिती सदस्य विवेक मराठे, डॉ. गोविंद कासट, संस्थेचे सचिव वसंत बुटके, विद्या देसाई, माजी विद्यार्थी कांचन पाटील आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

समाजाने ज्यांना नाकारले त्या कुष्ठरोगी बांधवांना दाजी साहेबांनी एका सकारात्मक ध्येयातून स्वीकारले. तपोवन संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या हातांना सक्षम करीत कुष्ठरोगी स्वातंत्र्य व्यक्तिमत्व दिले. दाजी साहेबांनी दिलेली विचारधारा व ध्येयातून आजवर तपोवन ही संस्था यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये तपोवन नव्याने व्यापक स्वरूप साकारेल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अतुल आळशी यांनी या सोहळ्यात व्यक्त केला.

हेही वाचा - दागिन्यांची चोरी करून पळताना चोर पडला; नागरिकांनी बेशुद्ध होईपर्यंत चोपला

या सोहळ्याला उपस्थित राहून आपल्या जबाबदारीतून समाजाकरता सकारात्मक कार्याची जाणीव व प्रेरणा आपणास मिळाली असे महापौर चेतन गावंडे म्हणाले. आज परिस्थिती बदलली आहे. मात्र, तपोवन आजही त्याचा आदर्श विचारांवर वाटचाल करीत समाजासाठी कार्य करीत आहे. याकरिता संस्थेला अनेक मूलभूत सुविधांची गरज भासत असून त्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासनही महापौर गावंडे यांनी यावेळी दिले. या सोहळ्याला तपोवनात राहणारे कुष्ठरुग्ण बांधव, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा - अमरावतीच्या ईटकीमध्ये शेतकरी कुटुंबावर सशस्त्र हल्ला, एक गंभीर

Intro:अमरावतीचे भूषण असलेले स्वातंत्र्य सेनानी व थोर समाजसेवक विदर्भ महारोगी सेवा समिती तपोवन चे संस्थापक पद्मश्री डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांचा 128 व जयंती उत्सव अमरावतीच्या तपोवन येथील शिव उद्यानात आज उत्साहात साजरा करण्यात आला.

Body:तपोवन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अतुल आळशी यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्याला आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त अजय कुलकर्णी, माजी लेडी गव्हर्नर कमल गवई, अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, तपोवन संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष गवई, नियामक समिती सदस्य विवेक मराठे, डॉ. गोविंद कासट संस्थेचे सचिव वसंत बुटके, विद्या देसाई माजी विद्यार्थी कांचन पाटील आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
समाजाने ज्यांना नाकारले त्या कष्टबांधवांना दाजी साहेबांनी एका सकारात्मक ध्येयातून स्वीकारलं. तपोवन संस्थेच्या माध्यमातून तिच्या हातांना सक्षम करीत कुष्ठ बांधवांना स्वातंत्र्य व्यक्तिमत्व दिलं. दाजी साहेबांनी दिलेली विचारधारा व ध्येयातून आजवर तपोवन ही संस्था यशस्वीपणे वाटचाल करीत असून येत्या काही वर्षांमध्ये तपोवन नव्याने व्यापक स्वरूप साकारले असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष डॉ अतुल आळशी यांनी या सोहळ्यात व्यक्त केला.
या सोहळ्याला उपस्थित राहून आपल्या जबाबदारीतून समाजाकरिता सकारात्मक कार्याची जाणीव व प्रेरणा आपणास मिळाली असे महापौर चेतन गावंडे म्हणाले. आज परिस्थिती बदलली आहे. मात्र तपोवन आजही त्याचा आदर्श विचारांवर वाटचाल करीत समाजासाठी कार्य करीत आहे. याकरिता संस्थेला अनेक मूलभूत सुविधांची गरज भासत असून त्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासनही महापौर चेतन गावंडे यांनी यावेळी दिले. या सोहळ्याला तपोवनात राहणारे कुष्ठरुग्ण बांधव माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.