अमरावती - आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. मात्र, देशासह राज्यात कोरोनाचे सावट असल्याने जिल्ह्यात अतिशय सध्या पद्धतीने बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली. बाबासाहेबांच्या जयंती निमित्त दरवर्षी १४ एप्रिलला शहरातील इर्विन चौकात मोठी यात्रा भरते. मात्र, कोरोनामुळे आज संपूर्ण परिसरात शुकशुकाट दिसून आला.
आज सकाळी शहरातील मान्यवर, नेते आणि नगरसेवकांनी इर्विन चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण पुतळा परिसर बॅरिकेड्स लावून बंद केला. त्यामुळे, सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या काही अनुयायांनी दुरूनच त्यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. दुपारी १२ नंतर मात्र संपूर्ण परिसर शांत झाला. यावर्षी कोरोनामुळे इर्विन चौकात साजरा होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने महामानवाची जयंती शहरात साद्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
हेही वाचा- प्रधानमंत्री योजनेंतर्गत खात्यावर पैसे जमा, मेळघाटात बँकेसमोर उसळली गर्दी