ETV Bharat / state

Earth Balance Disturbed: पृथ्वीला ताप आला आहे, विद्यार्थ्यांना याची जाणीव झाली पाहिजे : डॉ. संस्कृती मेनन - surface of the earth has also warmed

जगात झालेल्या औद्योगिक क्रांतीपासून ( Earth Balance has Definitely been Disturbed ) आजपर्यंत पृथ्वीच्या तापमानात एक डिग्री सेंटीग्रेडपर्यंत ( Increase in Temperature of Earth ) वाढ झाली आहे. एक डिग्रीने नेमका काय फरक पडतो, असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित ( Environmental Education and Climate Change ) करतात. वास्तवात माणसाच्या शरीराचे तापमान एक डिग्रीने वाढले, तर त्याची प्रकृती बिघडून जाते. असाच परिणाम पृथ्वीचे तापमान वाढल्याने झाला आहे. एका शब्दात सांगायचे तर पृथ्वीला ताप आला आहे.

Dr According to Sanskriti Menon, Students Should be Aware of Rising Temperature of Earth
पृथ्वीला ताप आला आहे, विद्यार्थ्यांना याची जाणीव झाली पाहिजे : डॉ. संस्कृती मेनन
author img

By

Published : Jan 2, 2023, 4:54 PM IST

Updated : Jan 2, 2023, 5:53 PM IST

पृथ्वीला ताप आला आहे, विद्यार्थ्यांना याची जाणीव झाली पाहिजे

अमरावती : पृथ्वीच्या तापमानात वाढ झाल्याने पृथ्वीचे संतुलन निश्चितच बिघडले ( Earth Balance has Definitely been Disturbed ) आहे. पृथ्वीच्या बिघडलेल्या संतुलनाची काळजी ही भावी पिढीलाच ( Increase in Temperature of Earth ) घ्यायची आहे. यामुळेच पर्यावरण शिक्षण आणि हवामान बदल ही संकल्पना आता शालेय अभ्यासक्रमात आली ( Environmental Education and Climate Change ) आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्याने किती गंभीर परिणाम होऊ शकतात याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये व्हावी या उद्देशानेच अभ्यासक्रमात हा महत्त्वपूर्ण विषय आता नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.

दुष्परिणामावर मात करण्यासाठी भावी पिढी सज्ज झाली पाहिजे भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामावर मात करण्यासाठी आपली भावी पिढी म्हणजे आजचे विद्यार्थी सज्ज व्हायला हवेत. हाच या मागचा महत्त्वपूर्ण हेतू असल्याचे केंद्रीय पर्यावरण शिक्षण संस्थेच्या वरिष्ठ प्रकल्प संचालक डॉक्टर संस्कृती मेनन यांनी म्हटले आहे. अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे राज्यातील नऊ जिल्ह्यांतील एकूण दहा हजार शिक्षकांना पर्यावरण विषयासंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर संस्कृती मेनन आल्या असता त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास संवाद साधला.

पृथ्वीचे तापमान वाढल्याचा परिणाम ( Effect of increase in temperature of the earth ) पृथ्वीचे तापमान एक डिग्री सेंटीग्रेडने वाढल्यामुळे त्याचे भीषण परिणामदेखील जाणवायला लागले आहेत. पृथ्वीवर काही भागात अतिवृष्टी होत आहे, तर अनेक ठिकाणी प्रचंड दुष्काळ पडतो आहे. काही भागांत पूर येतो. याचा परिणाम जैवविविधतेवर पडतो. जंगलांवरदेखील परिणाम होतो आहे. शेतीवरदेखील याचा मोठा परिणाम सध्या दिसायला लागलो आहे. आंबे आणि संत्रा उत्पादनावरदेखील प्रचंड तफावत जाणवायला लागली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात वीजदेखील कोसळायला लागली आहे. हे सर्व परिणाम दीर्घकाळापर्यंत राहू शकतात. या संपूर्ण बदलामुळे मानवाच्या आर्थिक परिस्थितीवरदेखील याचे दुष्परिणाम होऊ शकतात, असे डॉ. संस्कृती मेनन म्हणाल्या.

जगभर वाढलेत मच्छर ( Mosquitoes increase around the world ) पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे पूर्वी केवळ विशिष्ट काळात मच्छरांचे प्रमाण वाढायचे. आता मात्र बाराही महिने मच्छर दिसत आहेत. मच्छर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे मलेरिया आणि डेंग्यूसारखे आजारदेखील वाढले आहेत. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात मच्छरांचे प्रमाण वातावरणातील बदलामुळे वाढले आहे.

पृथ्वीची चादरही तापली ( surface of the earth has also warmed ) झपाट्याने होत असलेले औद्योगीकरण, वाहतूक यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशा घातक वायूपासून पृथ्वीचा ग्रीन हाऊसच्या माध्यमातून बचाव होऊ शकतो. यामुळे ग्रीन हाऊसचे प्रमाण वाढणे अतिशय गरजेचे आहे. ग्रीन हाऊस हे पृथ्वीची चादर म्हणून काम करतात. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे पृथ्वीची ही चादरदेखील तापली असल्याचे डॉ. संस्कृती मेनन यांनी सांगितले.

सुरक्षेसाठी अशी घ्यावी काळजी बदलत्या वातावरणाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येकाने सज्ज होणे आवश्यक आहे. ग्रीन हाऊसमध्ये वाढलेल्या वायूंना आटोक्यात आणण्यासाठी आपल्या खासगी वाहनांपेक्षा सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्यावर भर दिला गेल्यास कार्बन डायऑक्साईड निर्मितीचे प्रमाण कमी होऊ शकते. यांसह कुठे जाण्यासाठी वाहनांपेक्षा पायी चालण्याला किंवा सायकल चालवण्याला प्राधान्य देणे अतिशय गरजेचे आहे. कचऱ्याचे व्यवस्थापनदेखील आपण शिकायला हवे. प्लास्टिक, काच, कागद अशा वस्तू पुनर्निर्मितीसाठी द्यायला हव्यात. कचरा घरीच कंपोस्ट केल्याने मिथेनची निर्मिती होणार नाही. आज आपण चैनीच्या वस्तूंपेक्षा गरजेच्या वस्तूंवर भर देणेदेखील महत्त्वाचे आहे. यामुळेदेखील आपण पर्यावरणात होत असलेल्या बदलाचा सामना करण्यास मदत करू शकतो, असेदेखील डॉ. संस्कृती मेनन यांनी स्पष्ट केले.

वातावरणातील बदलांसह जगायला शिका वातावरणात आता पूर्वीपेक्षा फार मोठा बदल झालेला आहे. त्यामुळे आता या बदललेल्या वातावरणात आपल्याला जगणे शिकावे लागणार आहे. यामुळेच आता पृथ्वीवर येणाऱ्या संकटांची माहिती आपल्याला आधीच कळणे आवश्यक आहे. यासह आपल्या शेतीतही बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या शेतात कुठलेही पीक आपल्याला घेता यायला हवे. जर पूरपरिस्थिती निर्माण होत असेल किंवा एखाद्या वर्षी दुष्काळ पडत असेल अशा परिस्थितीत आपण आपल्या शेतात नेमके कोणते पीक घेऊ शकतो याचा अभ्यास आता आपल्याला आधीच करावा लागेल.

शिक्षकांवर नव्या पिढीला जागृत करण्याची जबाबदारी पूर्वी जगात कुठेही पर्यावरण हा विषय अभ्यासक्रमात नव्हता. आता मात्र पर्यावरण हा विषय काळाची गरज झाली आहे. नव्या पिढीला वातावरण बदलाचा जो काही सामना करावा लागणार आहे. त्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांना नेमकी कशी तयारी करावी लागेल हे शिकवण्याची जबाबदारी आजच्या शिक्षकांवर आहे. यामुळेच आम्ही शिक्षकांना पर्यावरण विषयात सक्षम बनवित आहोत. शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण विषय सर्वत्र शिकवला जात आहे. या विषयाचे गांभीर्य ओळखून विद्यापीठांनीदेखील पर्यावरणाचा अभ्यासक्रम आखणे काळाची गरज असल्याचे डॉ. संस्कृती मेनन यांनी सांगितले.

Last Updated : Jan 2, 2023, 5:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.