ETV Bharat / state

Medical Controversy : अमरावतीत डिस्कउंटचा वाद ; २८ मेडिकल धारकांविरुद्ध गुन्हा - Amol Sarve

मेडिकल क्षेत्रात डिस्काऊंटमुळे पेटलेला वाद पोलिस ठाण्यात पोहोचला आहे. मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांसह तब्बल 28 पेक्षा अधिक मेडिकल संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Medical Controversy
Medical Controversy
author img

By

Published : Jun 2, 2023, 9:46 PM IST

अमरावती : मेडिकल क्षेत्रात डिस्काऊंटमुळे पेटलेला वाद पोलिस ठाण्यात पोहोचला आहे. 1 जून रोजी उघड झालेल्या या वादामुळे मेडिकल क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अमोल सार्वे (45, रा. मायानगर) यांनी तक्रार नोंदविली. अन्य मेडिकलच्या तुलनेत जेनरिक, कंपनीचे थेट आऊटलेट अधिक डिस्काऊंट देते, त्यातून हा वाद उद्भवला.

असा आहे संपूर्ण प्रकार : तक्रारकर्ते अमोल सार्वे हे एका मेडिकल कंपनीमध्ये व्यवस्थापक आहेत. त्या कंपनीची शहरात पाच मेडिकल शॉप आहेत. ते ग्राहकांना एमआरपीपेक्षा 20 ते 27 टक्के डिस्काऊंट देत औषधविक्री करतात. आमच्या या ‘विथ डिस्काऊंट’ विक्रीला अमरावतीच्या काही मेडिकलधारकांचा नेहमी विरोध असतो. आम्ही डिस्काऊंट देऊ नये, अशी त्यांची भूमिका असल्याचे सार्वे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

आम्हालाही व्यापार करायचा आहे. ते डिस्काऊंट फलक लावून नागरिकांची दिशाभूल करत आहेत. जिल्ह्यातील दोन हजार कुटुंबांचा प्रश्न आहे. आम्ही डिस्काउंट संदर्भातील फलक काढण्याची विनंती केली होती. - सौरभ मालाणी, अध्यक्ष, अमरावती केमिस्ट असोसिएशन

80 हजारांचे नुकसान : 23 मे रोजी अमरावती केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ मालानी अन्य 27 पेक्षा अधिक जण त्या कंपनीच्या साईनगर, शिलांगण रोड, नवाथेनगर, रविनगर, गणेश कॉलनी येथील मेडिकल शाखेत गेल्याचा आरोप आहे. मालानी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या कंपनीच्या मेडिकलमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांना धमकावले. काचेवरील, शॉपच्या आतील डिस्काऊंटचे बॅनर, स्टिकर फाडले. ग्लोसाईन बोर्डवर वायर तोडल्या. दुकानात अनधिकृतपणे शिरून काऊंटरवरील बिल, कागदपत्रे हिसकवली. त्यांनी व्हिडीओ शुटिंगदेखील केली. या सर्व प्रकाराचा ग्राहक व कर्मचाऱ्यांना नाहक त्रास झाला. यात सुमारे 80 हजारांचे नुकसान झाल्याचे सार्वे यांनी म्हटले आहे.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल : या प्रकरणात सौरभ मालानी, प्रवीण देशमुख, संजय बोबडे, राजा नानवाणी, मनोज डफळे, योगेश देशमुख, अंकुश अग्रवाल, सागर आडे, संजय नानवाणी, दीप नाथाणी, आनंद अग्रवाल, हरिश लढ्ढा, सारंग सूर्यवंशी, कौशल सारडा, अनिल टाले, गोविंद केला, पंकज डाफ, सचिन रहाटे, अक्षय ढोरे, विक्की खेरडे, श्रीेकांत नवाथे, प्रफुल देऊळकर, सौरभ केवळे, शैलेश सोनटक्के, अनुराग मालानी, अमित तापडिया, जय छाबडिया यांच्या वितोधात शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.