ETV Bharat / state

रातोरात बसवला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; परवानगी नसल्यामुळे झाला राडा - छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यावरुन वाद

राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ( Statue of Chhatrapati Shivaji Maharaj ) युवा स्वाभिमानी संघटनेने (Youth self-esteem organization ) बसवला होता. हा पुतळा बसवण्यास परवानगी नसल्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.

शिवाजी महाराजांचा पुतळा
शिवाजी महाराजांचा पुतळा
author img

By

Published : Jan 12, 2022, 5:38 PM IST

अमरावती : राजापेठ उड्डाणपुलावर ( Rajapeth flyover ) युवा स्वाभिमानी संघटनेने आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. हा पुतळा बसवण्यासाठी कुठलीही परवानगी घेतली नसल्यामुळे पोलिसांनी पुतळा बसविण्यास विरोध केला. त्यामुळे रात्री बारा वाजल्यापासून बुधवारी पहाटे पाच वाजेपर्यंत राजापेठ उड्डाणपुलावर, पोलीस आणि युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन वाद

आज युवा स्वाभिमान संघटनेचा स्थापना दिवस -

12 जानेवारी युवा दिनाच्या पर्वावर युवा स्वाभिमानी संघटनेचा स्थापना दिवस आहे. त्यामुळे आज खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana )आणि आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवरच राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ( Statue of Chhatrapati Shivaji Maharaj ) बसवावा. तसेच या पुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

राज्य शासनाचा केला निषेध -

राजापेठ उड्डाणपुलावर बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोलिसांनी उचलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यात शिवसेनेचे सरकार (Shiv Sena government in the state ) असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यास विरोध होत, असल्याचा आरोप करीत युवा स्वाभिमानी संघटनेच्या वतीने राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी राजापेठ उड्डाणपुलावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.