अमरावती - राज्य शासनाने 33 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील धामणगाव शहरात देखील वृक्ष लागवड सुरु आहे. परंतू यासोबतच शहराला पॉलिथिन व कचरामुक्त करण्याचाही संकल्प धामणगाव नगरपरिषदेने घेतला आहे.
शहर कचरामुक्तीसाठी नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी घरोघरी वृक्षभेट, कापडी पिशवी तसेच कचरा टोपली भेट दिली आहे. त्यासोबतच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. शहर कचरामुक्त व्हाव व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक असल्याचे मत नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी यावेळी केले.