ETV Bharat / state

विसर्जनास बंदी असलेल्या तलावात आमदारानेच केले गणपती विसर्जन - मालखेड तलावावर गणपती विसर्जनास पूर्णतः बंदी

चांदुरे रेल्वे तालुक्यातील मालखेड तलावावर गणपती विसर्जनास बंदी असतानाही, आमदार विरेंद्र जगताप यांनी त्याच तलावात गणपती विसर्जन केले आहे.

विसर्जनास बंदी असलेल्या तलावात आमदारानेच केले गणपती विसर्जन
author img

By

Published : Sep 17, 2019, 5:38 PM IST

अमरावती - गणपती विसर्जनामुळे तलावातील पाणी दूषित होऊ नये, यासाठी अमरावतीच्या चांदुरे रेल्वे तालुक्यातील मालखेड तलावावर गणपती विसर्जनास पूर्णतः बंदी करण्यात आली होती. मात्र असे असतानाही धामणगाव-चांदुर रेल्वे मतदार संघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार विरेंद्र जगताप यांनीच नियम मोडत मालखेड तलावात गणपती विसर्जन केल्याचे समोर आले आहे.

dhamangaon chandur railway MLA done Ganpati immersion in the lake where the immersion was banned
चांदुरे रेल्वे तालुक्यातील मालखेड तलावावर गणपती विसर्जनास बंदी असतानाही, आमदार विरेंद्र जगताप यांनी त्याच तलावात गणपती विसर्जन केले

हेही वाचा... संतापजनक.. दलित असल्याने भाजप खासदाराला मंदिर प्रवेश नाकारला

आमदारांना एक आणि जनतेला वेगळा न्याय का ?

सर्व सामान्य लोकांना त्या तलावावर गणपती विसर्जनास बंदी आहे. मात्,र आमदारांनी गणपती विसर्जन केल्याने लोकांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. आमदारांना एक आणि जनतेला वेगळा न्याय का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक प्रशासनाला विचारत आहे.

हेही वाचा... 'अजून म्हातारा झालो नाही, अनेकांना घरी बसवण्यासाठी बाहेर पडलोय'

पाटबंधारे विभागाच्या पत्राला आमदारांकडूनच केराची टोपली

अमरावतीच्या चांदुर रेल्वे तालुक्यातील मालखेड पर्यटन प्रकल्प आहे. याच प्रकल्पात हा मोठा तलाव आहे. या तलावातून चांदुर रेल्वे शहराला पाणी पुरवठा होतो. यावर्षी पावसाळा चांगला झाल्याने हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. पाणी जास्त असल्याने गणपती विसर्जन दरम्यान जीवितहानी होऊ नये. तसेच गणपती विसर्जनामुळे पाणी प्रदूषित होऊ नये. यासाठी पाटबंधारे विभागाने पत्र काढून या तलावात गणपती विसर्जनास पूर्ण बंदी असल्याचे आदेश असताना सुद्धा काँग्रेसचे आमदार विरेंद्र जगताप यांनी नियमाला खो देऊन आपल्या कुटुंबासोबत बिनधास्तपणे तलावावर गणपती विसर्जन केले आहे. दरम्यान सर्वसामान्य लोकांना कारवाईची भीती दाखवणारे प्रशासन आमदार महोदयांवर काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा... भारतातील पहिला स्काय वॉक प्रकल्प अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये

Intro:गणपती विसर्जनास बंदी असलेल्या तलावात आमदार विरेंद्र जगताप यांनी केले गणपती विसर्जन.

पाटबंधारे विभागाच्या पत्राला आमदारांकडूनच केराची टोपली .
-----------------------------------------------
अमरावती अँकर
गणपती विसर्जनामुळे तलावातील पाणी दूषित होऊ नये,तलावात गाळ साचू नये सोबतच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अमरावतीच्या चांदुरे रेल्वे तालुक्यातील मालखेड तलावावर गणपती विसर्जनास पूर्णता बंदी असताना सुद्धा धामणगाव चांदुर रेल्वे मतदार संघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार विरेंद्र जगताप यांनीच नियम मोडत मालखेड तलावात आपल्या कुटुंबा सोबत गणपती विसर्जन केल्याचे समोर आले आहे.सर्व सामान्य लोकांना त्या तलावावर गणपती विसर्जनास बंदी असताना.मग आमदारांना वेगळा न्याय का?? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक प्रशासनाला विचारत आहे.

अमरावतीच्या चांदुर रेल्वे तालुक्यातील मालखेड पर्यटन प्रकल्प आहे याचं प्रकल्पात मोठा तलाव आहे .या तलावातून चांदुर रेल्वे शहराला पाणी पुरवठा होतो.यावर्षी पावसाळा चांगला झाल्याने हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.पाणी जास्त असल्याने गणपती विसर्जना दरम्यान जीवित हानी होउ नये .तसेच गणपती विसर्जनामुळे पाणी प्रदूषित होऊ नये. यासाठी पाटबंधारे विभागाने पत्र काडून या तलावात गणपती विसर्जनास पूर्णता बंदी असल्याचे आदेश असताना सुद्धा काँग्रेसचे आमदार विरेंद्र जगताप यांनी नियमाला खो देऊन आपल्या कुटुंबासोबत बिनदास्त पने मालखेड तलावावर गणपती विसर्जन केल्याचा प्रकार समोर आला आहे.दरम्यान सर्वसामान्य लोकांना कारवाईची भीती दाखवणारे प्रशासन आमदार महोदयांवर काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.....Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.