अमरावती - राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व मंदिरे ही बंद करण्यात आली आहे .सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम वर बंदी आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा येथे गुढीपाडव्याला भरणारी मोठी यात्रा रद्द करण्यात आली आहे. उद्या गुढीपाडव्याला भाविकांनी सावंगा विठोबा येथे गर्दी न करता घरूनच दर्शन घेण्याचे भावनिक आवाहन मंदिर प्रशासन व सरपंच यांच्यावतीने भाविकांना करण्यात आले आहे.
गुढीपाडव्याला सावंगा विठोबा येथें भाविकांनी गर्दी न करण्याचे आवाहन...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमरावतीच्या चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा येथे गुढीपाडव्याला भरणारी मोठी यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला भाविकांनी सावंगा विठोबा येथे गर्दी न करता घरूनच दर्शन घेण्याचे भावनिक आवाहन मंदिर प्रशासन व सरपंच यांच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे.