ETV Bharat / state

Devendra Bhuyar sentenced : आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्याचा कारावास, वाचा नेमकं काय आहे प्रकरण? - देवेंद्र भुयार शिक्षा बातमी

जिल्हा परिषदेच्या सभेदरम्यान गट विकास अधिकाऱ्यावर पाण्याची बाटल्या फेकल्याच्या प्रकरणात वरुड-मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार ( Devendra Bhuyar Sentenced To Three Months ) यांना जिल्हा न्यायालयाने तीन महिने साधा कारावास आणि १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Devendra Bhuyar sentenced
Devendra Bhuyar sentenced
author img

By

Published : Jun 6, 2022, 9:20 PM IST

अमरावती - जिल्हा परिषदेच्या सभेदरम्यान गट विकास अधिकाऱ्यावर पाण्याची बाटल्या फेकल्याच्या प्रकरणात वरुड-मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार ( Devendra Bhuyar Sentenced To Three Months ) यांना जिल्हा न्यायालयाने तीन महिने साधा कारावास आणि १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

काय आहे प्रकरण - २८ मे २०१९ रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह येथे पाणी टंचाई विषयावर जिल्हा परिषदेची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार देवेंद्र भुयार जिल्हा परिषदेचे सदस्य होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांचेसह जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री, गटविकास अधिकारी सुभाष बोपटे (५६) उपस्थित होते. सभा सुरु असताना वरूड तालुक्याच्या पाणी टंचाईच्या विषयावर सुभाष बोपटे माहिती देत होते. यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी बोपटे यांच्या दिशेने साऊंड माईक व पाण्याच्या बॉटल्स फेकून मारल्या. यामुळे सभागृहात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर सीईओ मनीषा खत्री यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी सभागृहातून बाहेर पडले. याप्रकरणी सीईओ मनीषा खत्री यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात कार्यालयीन प्रमुख म्हणून आमदार देवेंद्र भुयार यांच्याविरोधात तक्रार दिली होती. तक्रारीवरून गाडगेनगर पोलीस ठाण्यात आमदार देवेंद्र महादेवराव भुयार (३३, रा. गव्हाणकुंड, ता. वरूड,जि. अमरावती) यांच्यावर कलम ३५३,१८६,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

देवेंद्र भुयार यांच्यावर गुन्हा सिद्ध - उपनिरीक्षक संतोष तोकलवाड यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सुनावणी दरम्यान कोणताही साक्षीदार फितूर झाला नाही. या प्रकरणात गटविकास अधिकारी सुभाष बोपटे यांची साक्ष महत्वाची ठरली. याप्रकरणात आमदार देवेंद्र भुयार यांनी कलम ३५३ गुन्हा सिद्ध झाला. जिल्हा न्यायाधीश (क्र.१) एस.एस.अडकर यांनी आमदार देवेंद्र भुयार यांना ३५३ कलमान्वये तीन महिन्याचाकारावास, १५ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.

हेही वाचा - Mumbai CP Pandey : नुपूर शर्मा यांना लवकरच समन्स; सलमान खान धमकी प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू - संजय पांडे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.