अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गुगामल वनपरिक्षेत्राच्या लेडी सिंघम म्हणून ओळख असलेल्या आरएफओ दिपाली चव्हाण यांनी गुरुवारी रात्री आत्महत्या केली. त्यांनी राहत्या घरी गोळ्या झाडून आपले जीवन संपवले. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. आत्महत्यापूर्वी त्यांनी एक चार पानांची सुसाईड नोट देखील लिहिती होती. त्यामध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येला वनाधिकारी शिवकुमार याला जबाबदार धरले आहे. जाणून घेऊयात दिपाली चव्हाण यांच्याबद्दल
कोण होत्या दिपाली चव्हाण?
दिपाली चव्हाण या मुळच्या साताऱ्या जिल्ह्यातील होत्या. त्याचे वडील हे विद्यापीठात नोकरीला असल्याने, दिपाली चव्हाण यांचे कुटुंब खेड येथे वास्तव्यास होते. 2 ऑक्टोंबर 1986 ला मध्यमवर्गीय कुटुंबात दिपाली चव्हाण यांचा जन्म झाला. त्यांनी लहाणपणापासूनच अधिकारी व्हायचे स्वन्प पाहिले होते. 2011 साली दिपाली यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दरम्यान लगेच सहा महिन्यानंतर भावाचा कर्करोगाने मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी दिपाली यांच्यावर आली.
अभ्यास करत केला कुटुंबाचा सांभाळ
आचानक आलेल्या या जबाबदारीमुळे खचून न जाता दिपाली यांनी, आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी कुटुंबाचा संभाळ करत असताना दुसरीकडे अभ्यास सुरूच ठेवला होता. 2014 साली त्या राज्यसेवा आयोगाची परीक्षा उतीर्ण झाल्या. त्यानंतर आरएफओ म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग ही धुळघाट रेल्वेमध्ये झाली. तेथे त्यांनी उत्तम कामगिरी केली. दरम्यान दिपाली यांचा अमरावती जिल्ह्यातील राजेश मोहिते यांच्याशी 2019 मध्ये प्रेमविवाह झाला. राजेश हे कोषागार कार्यलयात नोकरीला आहेत. त्यानंतर दिपाली चव्हाण यांची नियुक्ती मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गुगामल वनपरिक्षेत्रात झाली. मात्र त्यांनी गुरुवारी आपल्या राहत्या घरी गोळ्या झाडून आत्महत्या केली.