अमरावती - मोर्शी तालुक्यातील दमयंती नदीच्या काठावर मृत नवजात अर्भक आढळल्याची घटना घटना घडली. हे अर्भक पुरुष जातीचे आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. अनैतिक संबंधातून या बाळाला जन्म दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सकाळच्या सुमारास हे मृत अर्भक येथे टाकण्यात आला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अर्भकाचा मृतदेह रुग्णालयात ठेवला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.