अमरावती - कोरोना काळात जिवाची पर्वा न करता 24 तास सेवा देणाऱ्या अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन वेळेवर होत नाही. त्यामुळे वेतन आणि इतर समस्यांसाठी या आरोग्यसेवकांनी अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे धाव घेत आंदोलन केले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वेतन वेळवर मिळावे. तसेच दर महिन्याचे वेतन 5 तारखेच्या आत मिळावे. तसेच सातव्या वेतन आयोगाचा प्रथम हप्ता देण्यात यावा, या मागण्या यावेळी करण्यात आल्या. कोरोनामध्ये सेवा देऊनही शासनाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला.
दर महिन्यात या कर्मचाऱ्यांचे वेतन हे २० तारखेला होते. परंतु हे वेतन ५ तारखेला मिळावे, तसेच सातव्या वेतन आयोगानुसार नुसार कर्मचारी यांना वेतन देण्यात यावे. आदी मागण्या या आरोग्य कर्मचारी यांच्या आहेत.