ETV Bharat / state

Corona patient found : कोरोनाचा एक रुग्ण आढळला, चाचण्या पुन्हा झाल्या सुरू - Corona patient found

अमरावती कोरोनाचा एक रुग्ण आढळला ( Corona patient found in Amravati ) आहे. एकीकडे देशात कोरोना वाढण्याची शक्यता वर्तवली जात असताना अशी घटना घडल्यामुळे अमरावती कोरोना चाचण्या पुन्हा सुरू झाल्या ( Corona tests started again ) आहेत. 126 चाचण्या मंगळवारी झाल्या आहेत.

Corona patient found
कोरोनाचा रुग्ण आढळला
author img

By

Published : Dec 29, 2022, 10:08 AM IST

कोरोनाचा रुग्ण आढळला

अमरावती : देशात पुन्हा एकदा कोरोना वाढण्याची शक्यता वर्तवली जात असताना गत तीन दिवसात देशात 457 कोरोना रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली ( Corona patient found in Amravati ) आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा प्रशासन देखील सतर्क झाले असून जिल्ह्यात तब्बल महिनाभरानंतर 24 डिसेंबरला कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. देशातील अनेक राज्यात कोरोना झपाट्याने वाढत असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झालेल्या अमरावती जिल्हा प्रशासन देखील सतर्क झाले असून आता कोरोना चाचण्या देखील वाढविण्यात आल्या ( Corona tests started again ) आहेत.

अमरावतीतील कोरोना आकडेवारी : अमरावती शहर आणि जिल्ह्यात सध्या कोरोना संदर्भात भीती सारखे कुठलेही वातावरण ( Corona in Amravati ) नाही. मात्र सप्टेंबर महिन्याच्या पंधरा तारखेला अमरावती जिल्ह्यात एकूण चार रुग्ण आढळून आले होते. विशेष म्हणजे 15 सप्टेंबरनंतर 16 आणि 17 सप्टेंबरला देखील चार रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर 19 सप्टेंबरला एक रुग्ण आढळून आला तर 20 सप्टेंबरला सहा कोरोना बाधित अमरावती जिल्ह्यात आढळून आले होते. 21 सप्टेंबरला साथ 22 सप्टेंबरला नऊ , 23 सप्टेंबरला सहा , 24 सप्टेंबरला पाच, 25 सप्टेंबरला दोन, 26 सप्टेंबरला दोन, 7 सप्टेंबरला एक ,28 सप्टेंबरला एक, 29 सप्टेंबरला तीन अशी कोरोनाची परिस्थिती अमरावती. ऑक्टोबर महिन्यात देखील जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळत होते एक ऑक्टोबरला जिल्ह्यात पाच जणांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले .2 ऑक्टोबरला देखील सहा कोरोना बाधित आढळून आले. 3 ऑक्टोबरला एक, 4 ऑक्टोबरला 6, 5 ऑक्टोबरला दोन, 6 ऑक्टोबरला तीन 8 ऑक्टोबरला 7, नऊ ऑक्टोबरला 6, 21 ऑक्टोबरला एक 28 ऑक्टोबरला एक 29 ऑक्टोबर ला एक आणि 30 ऑक्टोबरला देखील एक रुग्ण आढळून आला. नोव्हेंबर महिन्यात मात्र सर्वात कमी कोरोना रुग्ण आढळून आले 18 आणि 24 नोव्हेंबरला प्रत्येकी एक रुग्ण जिल्ह्यात आढळून आला होता.

महिनाभरानंतर आढळला कोरोना रुग्ण : अमरावती जिल्ह्यात आता 23 डिसेंबर रोजी एक कोरोना रुग्ण आढळून ( Chances Increasing Corona In Country ) आला. 24 नोव्हेंबरला आढळून आलेल्या रुग्णानंतर तब्बल महिनाभरानंतर अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोना जिल्ह्यातून अद्यापही संपुष्टात आला नाही हे स्पष्ट झाले. सध्या अमरावती जिल्ह्यात एक कोरोना रुग्ण असून आतापर्यंत जिल्ह्यात 1, लाख 7 हजार 126 जणांना कोरोना झाला आहे.

बंद होणार होती कोरोना चाचणी प्रयोगशाळा : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सलग दोन वर्षांपासून कोरोना चाचणी अहवाल देणारी प्रयोगशाळा 31 डिसेंबर पासून बंद होणार होती. मात्र आता कोरोना संदर्भात संपूर्ण देशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असताना विद्यापीठातील ही कोरोना चाचणी प्रयोगशाळा 31 डिसेंबर पासून बंद होणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे. या प्रयोग शाळेत 126 चाचण्या मंगळवारी करण्यात ( 126 Corona Tests Done in Amravati on Tuesday ) आल्या. कोरोना चाचणी करण्यासाठी ही प्रयोगशाळा आजही सक्षम असल्याची माहिती या प्रयोगशाळेचे प्रमुख प्रा. डॉ.प्रशांत ठाकरे यांनी 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना दिली. या प्रयोगशाळेत कुठलाही प्रकारचा मोबदला न घेता विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीच चाचणीचे काम केले. विशेष म्हणजे या प्रयोगशाळेत वर्षभराच्या कामाच्या अनुभवावर एक विद्यार्थिनी थेट अमेरिकेतील प्रयोगशाळेत निवडल्या गेली. तसेच पाच सहा विद्यार्थ्यांना चांगल्या ठिकाणी जॉब उपलब्ध झाला अशी माहिती देखील प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे यांनी ( Dr Prashant Thackeray Amravati University Professor ) दिली. ही प्रयोगशाळा आज देखील कोरोना चाचणी करण्यास सक्षम आहे. कोरोनाची दुसरी लाट अमरावतीतूनच प्रसारित झाली होती त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार आम्ही पुन्हा एकदा सज्ज आहोत असे देखील प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे म्हणाले.

रेल्वे स्थानकावर कोरोना चाचणी : अमरावती रेल्वे स्थानकावर बाहेर गावावरून येणाऱ्या प्रवाशांची कोरोनाचाचणी करण्यासाठी पथक गठीत करण्यात आले आहे. रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच गत दोन महिन्यांपासून प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. ही चाचणी बंधनकारक नव्हती आता मात्र प्रवाशांना चाचणी करण्याचे आवाहन केल्या जात आहे.

मॉकड्रिलनंतर जिल्हा सज्ज : कोरोनाशी लढा देण्यासाठी कशा स्वरूपाच्या उपाययोजना करायला हव्या या संदर्भात दोन दिवसांपूर्वीच जिल्हा आरोग्य प्रशासनाला ऑनलाइन द्वारे सतर्क करण्यात आले. या ऑनलाइन मॉक ड्रिल मुळे आता नेमकी कशा स्वरूपाची काळजी घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. पूर्वीप्रमाणेच आंतरराखणे हात स्वच्छ धुणे आणि मास्क चा वापर करणे या त्रिसूत्री वापरणे अत्यंत गरजेचे आहे. आता कोरोनाची फारसी भीती बाळगण्याचे कारण नाही. भयावह असे काहीही होणार नाही मात्र सर्वांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रा. डॉ.प्रशांत ठाकरे यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.