अमरावती : आज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी (Mahaparinirvan Din) आहे. आज शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जिल्ह्यातील नया अकोला या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींच्या दर्शनासाठी शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या भव्य पदयात्रा काढण्यात आली.
अनुयायांसाठी महत्त्वाचे ठिकाण : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईला जाऊन शकणाऱ्या अमरावतीसह विदर्भातील बाबासाहेबांच्या शेकडो अनुयायांसाठी नया अकोला येथील बाबासाहेबांचे अस्थिस्थळ हे अतिशय महत्त्वाचे आणि प्रेरणादायी स्थळ आहे. आमचे नेते राहुल गांधी यांनी नफरत छोडो भारत जोडो हा जो काही नारा दिला आहे, त्या नाऱ्याला आजची पदयात्रा प्रतिसादच असल्याचे माजी मंत्री यशोमती ठाकूर 'ईटीव्ही भारत 'शी बोलताना म्हणाल्या. सत्ताधारी हे संविधानाला फिगर म्हणतात मात्र संविधानाचे महत्त्व नेमके काय आहे, याबाबत जनजागृती करण्यासाठी देखील हे आंदोलन असल्याचे यशोमती ठाकूर (occasion of Mahaparinirvan Din) म्हणाल्या.
हजारो नागरिकांचा सहभाग : या पदयात्रेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हजारो अनुयायी सहभागी झाले आहेत. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्यासह माजी महापौर विलास इंगोले दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांच्यासह शहर आणि जिल्हा काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले आहेत. नया अकोला या ठिकाणी 9 डिसेंबर 1956 रोजी स्थापन करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींना पदयात्रेत सहभागी अभिवादन करणार (Congress Pad Yatra To Naya Akola) आहेत.