ETV Bharat / state

ईडीची चौकशी म्हणजे लोकशाहीचा खून - यशोमती ठाकूर

भाजपच्या विरोधात जे कोणी बोलते त्यांच्यावर ईडीची चौकशी लावण्यात येत आहे. त्यामुळे ईडीची चौकशी म्हणजे लोकशाहीचा खून होत असल्याची टीका राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

yashomati thakur
यशोमती ठाकूर
author img

By

Published : Dec 28, 2020, 8:55 PM IST

Updated : Dec 28, 2020, 9:18 PM IST

अमरावती - भाजपच्या विरोधात जे कोणी बोलते त्यांच्यावर ईडीची चौकशी लावण्यात येत आहे. त्यामुळे ईडीची चौकशी म्हणजे लोकशाहीचा खून होत असल्याची टीका राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. ज्या भाजपच्या लोकांच्या बँक खात्यामध्ये अवैधरित्या पैसे जमा झालेत त्यांच्यावर ईडी चौकशी का लागत नाही, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

यशोमती ठाकूर प्रतिक्रिया देताना
ज्यांनी-ज्यांनी भाजपची सत्यता समोर आणली त्यांच्यावर ईडीची कारवाई होत आहे. त्यामुळे देशाचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर जात असून ईडी सोबतच शेतकऱ्यांचे सुद्धा राजकरण होत आहे. ज्या राजधानी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाला बसतात, त्याच ठिकाणी देशाचे प्रमुख दीपावली साजरी करतात, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी यावेळी केली.

Last Updated : Dec 28, 2020, 9:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.