ETV Bharat / state

अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. वास्तवात आज शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही. शेतकरी संकटात असताना केवळ खोटी आश्वासन दिली जात आहेत, असा आरोप यावेळी काँग्रेस नेत्यांनी केला.

जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करताना काँग्रेस कार्यकर्ते
author img

By

Published : Jul 22, 2019, 10:36 PM IST

अमरावती - जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री केवळ आश्वासन देत आहेत. शेतकऱ्यांचे दुःख, वास्तविक परिस्थिती पाहता अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी सोमवारी जिल्हा काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे केली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी सरकारकला जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती कळविण्यात येईल, असे आश्वासन दिले.

जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करताना काँग्रेस कार्यकर्ते

काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात शेकडो काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

राज्यातील भाजप सरकार शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यात अपयशी ठरले आहे. यावर्षी पाऊस झाला नसल्याने आजही अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा केला जातो आहे. शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याबाबत सरकार गंभीर नाही, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली.

Intro:समाधानकारक पाऊस झाला नसल्याने अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री केवळ फोक्या मारत आहेत. शेतकऱ्यांचे दुःख, वास्तविक परिस्थिती पाहता अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी माघाणी आज जिल्हा काँग्रेसने जिहाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला केली.

Body:काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात शेकडो काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी आज जिल्हाकाचेरीवर धडकले. राज्यातील भाजप सरकार शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यास सपशेल अपयशी ठरले आहे. यावर्षी पाऊस झाला नसल्याने आजही अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा केला जातो आहे. शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास सरकार गंभीर नाही. शेतकऱ्यांना उतपादन खर्चावर 50 टक्के नफा देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. वास्तवात आज शेतकऱ्यांच्या मालालाही हमी भाव मिळत नाही. शेतकरी संकटात असताना केवळ खोटे आश्वासन दिले जात आहेत असा आरोप यावेळी काँग्रेस नेत्यांनी केला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी सरकारकडे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती शासनाला कळविण्यात येईल असे आश्वासन दिले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.