ETV Bharat / state

#Video: व्हीआयपी दर्शनासाठी आमदार देवेंद्र भुयारांची मध्यप्रदेश पोलिसांवर दादागिरी

author img

By

Published : Feb 23, 2020, 12:24 PM IST

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील श्री क्षेत्र सालबर्डी हे देवस्थान आहे. महाशिवरात्रीला दोन्ही राज्यातील लाखो येथे येत असतात. या यात्रेचे विशेष म्हणजे यात्रा ही महाराष्ट्रात तर मुख्य पहाळावर असलेले मंदिर हे मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यात येते. त्यामुळे येथे मध्यप्रदेश पोलिसांचा ताफा तैनात असतो.

mla devendra bhuyar
आमदार देवेंद्र भुयार मध्यप्रदेश पोलिसांवर दादागिरी

अमरावती - मोर्शी वरुड मतदार संघाचे शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मध्यप्रदेशातील सालबर्डी देवस्थान येथे महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविकांच्या मागून येऊन तत्काळ व्हीआयपी दर्शन मागितले होते. मात्र, लाखो भाविकांच्या गर्दीत तुम्हाला तत्काळ दर्शन देणे शक्य नसल्याचे मध्यप्रदेश पोलिसांनी भुयार यांना सांगितले होते. दरम्यान, व्हीआयपी दर्शन न मिळाल्याचा संताप आमदार महोदयांना येताच त्यांनी मध्यप्रदेश पोलिसांशी हुज्जत घालत त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रकार समोर आला आहे.

हेही वाचा -

#Video: धक्कादायक.. पाण्याच्या टाकीवरुन उडी मारुन केली आत्महत्या

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील श्री क्षेत्र सालबर्डी हे देवस्थान आहे. महाशिवरात्रीला दोन्ही राज्यातील लाखो येथे येत असतात. या यात्रेचे विशेष म्हणजे यात्रा ही महाराष्ट्रात तर मुख्य पहाळावर असलेले मंदिर हे मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यात येते. त्यामुळे येथे मध्यप्रदेश पोलिसांचा ताफा तैनात असतो. दरम्यान, महाशिवरात्रीला दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक आले होते. त्याच दिवशी आमदार देवेंद्र भुयारसुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसोबत दर्शन घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी पोलिसांना तत्काळ दर्शन देण्याचा आग्रह केला. मात्र, गर्दी लक्षात घेता हे शक्य नसल्याने तुम्हाला रांगेत लागूनच दर्शन घ्यावे लागेल असे पोलीस प्रशासनाने आमदारांना ठणकावून सांगितले. दरम्यान, दर्शन हे आमदार महोदयांच्या इच्छेविरुद्ध होत असल्याने अचानक आमदारांना राग अनावर झाला आणि थेट त्यांनी पोलिसांशीच हुज्जत घातली आहे. एक जबाबदार आमदाराच पोलिसांच्या अंगावर गेल्याने पोलिसही भुयार यांना धक्काबुक्की करत जशास तसे उत्तर दिल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा -

धक्कादायक..! चक्क उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या आदेशाची बनवली बनावट प्रत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.