ETV Bharat / state

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करणारी समिती बदलावी - खासदार नवनीत राणा - दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण

खासदार नवनीत राणा यांनी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशी करणारी समितीच बदलण्याची मागणी केली. तसे पत्र त्यांनी पंतप्रधानांना लिहिले आहे.

Navneet Rana
Navneet Rana
author img

By

Published : Sep 5, 2021, 3:58 AM IST

अमरावती - मेळघाटमधील हरिसाल वनपरिक्षेत्राच्या आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी वनखात्याने गठीत केलेल्या चौकशी समितीचे अध्यक्ष एम.के. राव यांनी सेवानिवृत्तीच्या आदल्या दिवशी अहवाल वन विभागाला सादर केला होता. यात समितीचे अध्यक्ष एम.के.राव यांनी निलंबित मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना क्लीनचिट दिली. त्यामुळे या चौकशी समितीवरच संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता अमरावतीच्या खासदार नवनीत राना यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया

पंतप्रधानांना लिहीले पत्र -

खासदार नवनीत राणा यांनी थेट आता चौकशी समितीच बदलण्याची मागणी केली आहे. सध्या जी चौकशी समिती नेमलेली आहे. त्या समितीमधील सदस्य हे श्रीनिवास रेड्डी यांच्यासोबत काम केलेली आहे. त्यामुळे ही चौकशी समिती दिपाली चव्हाणला न्याय देऊ शकत नाही, असे मत खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केले. याप्रकरणी आता खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दुसरी समिती नेमण्याची मागणी त्यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण -

हरिसाल व्याघ्र प्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी २५ मार्चरोजी सायंकाळी 7 वाजता हरिसाल येथील सरकारी बंगल्यात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. हरिसाल येथे व्याघ्र प्रकल्पाच्या शासकीय घरात दिपाली चव्हाण यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहित त्यामध्ये वन अधिकारी शिवकुमार यांच्यावर आरोप केले होते. गर्भवती असतानादेखील पायी फिरविले असून मानसिक छळ केल्याचा आरोप या सुसाईड नोटमधून करण्यात आला होता. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले होते. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर रेड्डी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली होती. त्यानंतर रेड्डी यांचे निलंबनही करण्यात आले होते. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात काही अधिकाऱ्यांची नावेही घेतली होती. त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी रेड्डी यांचे अखेर निलंबन करण्यात आले होते. अखेर चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अमरावती जिल्ह्यातील धारणी पोलिसांनी रेड्डी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त करणे व इतर विविध गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदवला होता.

हेही वाचा - ईडीचा वापर करून केंद्र सरकारकडून विरोधकांना नमवण्याचा प्रयत्न - शरद पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.