ETV Bharat / state

दहावी-बारावी निकालासाठी तज्ज्ञांची कमिटी नेमली जाणार - शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू - दहावी बारावीचा निकाल

याबाबत वेळेत निकाल जाहीर करण्याच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मंत्री बच्चू कडू यांनी तज्ज्ञांची कमिटी नियुक्त करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निकालाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही कडू यावेळी म्हणाले.

निकालासाठी तज्ज्ञांची कमिटी नेमली जाणार
निकालासाठी तज्ज्ञांची कमिटी नेमली जाणार
author img

By

Published : Jun 14, 2021, 12:30 PM IST

अमरावती - कोरोनामुळे दहावी बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मात्र आता या दोन्ही इयत्तांचे निकाल कधी आणि कशा पद्धतीने लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निकालाच्या पार्श्वभूमीवर निकालसंदर्भात शिक्षण विभागाकडून तज्ञांची एक कमिटी नेमण्यात येणार आहे. या संदर्भातील मागणी करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.

शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आता विद्यार्थ्यांचे निकाल कशा पद्धतीने लावले जाणार आणि कधीपर्यंत जाहीर केले जातील याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. याबाबत वेळेत निकाल जाहीर करण्याच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मंत्री बच्चू कडू यांनी तज्ज्ञांची कमिटी नियुक्त करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निकालाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही कडू यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.