ETV Bharat / state

अमरावतीच्या छत्री तलावात सुशोभीकरणाच्या नावे काँक्रिटचे जंगल; निसर्गप्रेमींचा विरोध

छत्री तलावाच्या पात्रात सौंदर्यीकरणाच्या नावावर चक्क काँक्रेटीकरण केले जात आहे. त्यामुळे तलावात काँक्रीटचे जंगल उभारण्यास निसर्गप्रेमी, नागरिकांनी विरोध दर्शवला असून जनआंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.

अमरावतीच्या छत्री तलावात सुशोभीकरणाच्या नावे काँक्रिटचे जंगल
author img

By

Published : Jun 7, 2019, 4:46 PM IST

अमरावती - शहराच्या पूर्वेस घनदाट जंगल आणि टेकड्यांनी वेढलेल्या भागात असणाऱ्या छत्री तलावाच्या पात्रात सौंदर्यीकरणाच्या नावावर चक्क काँक्रेटीकरण केले जात आहे. त्यामुळे तलावात काँक्रीटचे जंगल उभारण्यास निसर्गप्रेमी, नागरिकांनी विरोध दर्शवला असून जनआंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्री तलाव हे शहरातील अतिशय महत्वाचे पर्यटन स्थळ तसेच पोहरा, मालखेड जंगलातील बिबट, नीलगाय, हरीण, मोर अशा अनेक प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे महत्वाचे स्थान आहे. छत्री तलावाच्या थेट पात्रातच सौंदर्यीकरणाच्या नावाखाली महापालिका प्रशासनाने बांधकाम सुरू केले आहे. या बांधकामासाठी आमदार रवी राणा यांनी शासनाकडून 15 कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत.

तलावाच्या पात्रातच बांधकाम केले जात असल्याने हे सौंदर्यीकरण तलावात पाणी पिण्यासाठी येणाऱ्या जंगली श्वापदांसाठी धोकादायक असल्याचे निसर्गप्रेमी नागरिकांनी सांगितले. जंगलातील प्राण्यांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी पुढाकार घेत भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी नागरिकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी तलाव वाचविण्यासाठी जनआंदोलन उभारण्यासाठी मार्गदर्शन केले.

अमरावतीच्या छत्री तलावात सुशोभीकरणाच्या नावे काँक्रिटचे जंगल

तलावाच्या पश्चिम दिशेला सौंदर्यीकरण करा, येथील उद्यान विकसित करा मात्र थेट तलावात इमारती उभारण्याचे काम थांबवा, अन्यथा जनआंदोलनाद्वारे आम्ही प्राणी आणि जंगलाचे संरक्षण करू, असा इशारा शिवराय कुळकर्णी यांनी दिला आहे.

Intro:अमरावती शहराच्या पूर्वेस घनदाट जंगल आणि टेकड्यांनी वेढलेल्या भागात असणाऱ्या छत्री तलावाच्या पत्रात सौंदयरीकर्णच्या नावावर चक्क काँक्रेटिकरण केले जात आहे. राष्ट्रीय पणस्थल घोषित असणाऱ्या या तलावात काँक्रीटचे जंगल उन्हारण्यास निसर्गप्रेमी नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. तलाव वाचविण्यासाठी जनआंदोलन छेडण्याचा निर्णयही नागरिकांनी घेतला आहे.

Body:शहरातील अतिशय महत्वाचे पर्यटन स्थळ तसेच पोहरा, मालखेड जंगलातील बिबट, नीलगाय, हरणं,मोर आशा अनेक प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे महत्वाचे स्थान असणाऱ्या छत्री तलावाच्या थेट पत्रातच सौंदर्यीकर्णाच्या नावाखाली महापालिका प्रशासनाने बामधकाम सुरू केले आहे. हे काम सुरू होण्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी निलेश कांचंपुरे यांनी या प्रकलपाला विरोध करून जमजागृती माहीम सुरू केली. छत्री तलावातच सुरू असलेल्या बांधकामासाठी आमदार रवी राणा यांनी शासनाकडून 15 कोटी रुपये मंजूर करून आणलेत. शासनाने दिलेल्या या निधीतून महापालिकेकडून छत्री तलाव सौंदर्यीकर्णाचे काम सुरू आहे. दरम्यान तलावाच्या पत्रातच इमारती उभ्या केल्या जात असल्याने हे सौंदर्यीकरण तलावाची आणि तलावात पाणी पिण्यासाठी येणाऱ्या जंगली श्वापदांसाठी धोकादायक आहे अशी ओरड व्हायला लागली आहे. शासनाच्या निधीतून सुरू झालेल्या या कामामुळे वन विभागही हतबल झाले आहे. आशा परिस्थिती आता भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी छत्रीतलाव वाचवा. जंगलातील प्राण्यांना पाणी मिळावे यासाठी पुढाकार घेऊन कुठलेही राजकारण न करता छत्रीतलावातील बामधकाम थांबविण्याची मागणी प्रशासनाला केली आहे. काज सकाळी छत्री तलाव येथे नागरिकांची बैठक घेऊन तलाव वाचविण्यासाठी जनआंदोलन उभारम्याबाबत शिवराय कुळकर्णी यांनी मार्गदर्श केले. तलावाच्या पश्चिम दिशेला सौंदरीकरण करा, येथील उद्यान विकसित करा मात्र थेट तलावात इमारती उभारण्याचे काम थांबवा अन्यथा जनांदोलनद्वारे आम्ही तलावाचे याभागात प्राणी आणि जंगलाचे संरक्षण करू असा इशारा शिवराय कुळकर्णी यांनी दिला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.