अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड, चिखलदरा येथील गाविलगड, समुद्रात असलेला जंजिरा किल्ला असे विविध प्रकारचे किल्ले आपल्या कल्पक बुद्धीने चिमुकल्यांनी (children built imaginative castles ) आज अमरावतीत साकारले. (Shiv Castles in Amravati)
स्पर्धेचे रौप्य महोत्सव- शहरातील गोविंद बाबा मंदिर परिसरात असणाऱ्या देशपांडे लेआउट येथे आयोजित कल्पक किल्ले स्पर्धेत आज शेकडो विद्यार्थी किल्ले बनवण्यात दंग झाले. दिवाळीच्या पर्वावर श्री विठ्ठलानंद सरस्वती फिरते वाचनालय ,दस्तूर नगर सेवा समिती, श्रीकृष्ण भक्त मंडळ ,विदर्भ मलखांब असोसिएशन आणि जगद्गुरु महर्षी व्यास शिक्षण संस्थेच्या वतीने या स्पर्धेचा यावर्षी रोप्य महोत्सव आहे. या रोपटे महोत्सवी स्पर्धेत 25 वर्षांपूर्वी जी लहान मुलं या स्पर्धेत सहभागी झाली होती ते मुलं आज पालक म्हणून आपल्या पाल्यांसह या स्पर्धेत किल्ले बनवण्यात सहभागी झाले.
तीन गटात स्पर्धा - ही स्पर्धा एकूण तीन गटात आयोजित करण्यात आली होती पाच ते पंधरा वर्षे वयोगटाचा संभाजी गट 16 ते 30 वर्ष वयोगटाचा शिवाजी गट आणि एक कौटुंबिक गट निश्चित करण्यात आला होता. यापैकी संभाजी कट आणि शिवाजी गटाची स्पर्धा ही गोंड बाबा मंदिरालगत असणाऱ्या देशपांडे लेआउट परिसरातील उद्यानात आयोजित करण्यात आली होती तर कौटुंबिक गटात प्रत्येकाने आपल्या आपल्या घराच्या अंगणात किल्ला तयार करून त्याचा फोटो आयोजकांना पाठवायचा आहे. या स्पर्धेतील किल्ल्यांचे तज्ञ परीक्षकांकडून परीक्षण केले जाणार आहे तसेच कौटुंबिक गटातील किल्ल्यांचे परीक्षण स्पर्धेत सहभागी कुटुंबाच्या घरी जाऊन परीक्षक करणार आहेत.
अशी आहे ही स्पर्धा - चिमुकल्यांना आपली संस्कृती आपला इतिहास काढावा या उद्देशाने 25 वर्षांपासून कल्पक किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत संभाजी आणि शिवाजी गटात एक किल्ला बनविण्यासाठी चार जणांचा गट पाडला जातो. त्यांना माती आणि पाणी आयोजकांच्या वतीने उपलब्ध करून दिली जाते. स्पर्धकांना याव्यतिरिक्त इतर साहित्य किल्ल्या बनविण्यासाठी लागत असल्यास त्यांनी तो स्वतः आणण्याची मुभा दिली जाते. प्रत्येक गटास प्रथम पारितोषिक 2001 द्वितीय पारितोषिक बाराशे एक तृतीय पारूत्यशिक 701 आणि 31 रुपये प्रोत्साहन पर दिले जातात.