अमरावती : Child Slaughter For Secret Money : सुखदेव पाटोकार (40 वर्षे, रा. भांडुप तालुका, चिखलदरा), राम किशोर अखंडे (23 वर्षे, रा. बऱ्हाणपूर मध्य प्रदेश), संजय बारगंडे (35 वर्षे), सचिन बोबडे (50 वर्षे, रा. कुंबी गौरखेडा), मुक्ता बाभळे (६४ वर्षे, रा. टाकळी जहागीर) आणि रवी अधिकार असे अटक करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहे.
असा आहे संपूर्ण प्रकार : या संपूर्ण घटनेसंदर्भात नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी गुरुवारी माहिती दिली. सचिन बोबडे हा मांत्रिक असून तो मुक्ता भाबळे या महिलेचा नातेवाईक आहे. घरात गुप्तधन आहे अशी माहिती त्याने मुक्ता भाबळे यांना दिली. हे गुप्तधन शोधण्यासाठी पायाळू मुलाला आणून पूजाविधी करावा लागेल, असे सचिनने मुक्ता यांना सांगितले होते. आपल्याला गुप्तधन मिळेल या आमिषामुळे मुक्ता भाबळे यांनी त्यांच्या टाकळी जहागीर येथील घरात रात्रीच्या सुमारास पूजाविधी करण्याचे ठरवले. सुखदेव पाटोरकर हा मांत्रिक या पूजेसाठी त्यांच्या घरी आला. दरम्यान, एका ग्रामस्थाला गुप्तधन शोधण्यासाठी नरबळी दिल्या जात असल्याचा संशय आल्याने त्याने सुरू असलेल्या प्रकारावर लक्ष ठेवले.
दक्ष ग्रामस्थाने दाखविली तत्परता: या दक्ष ग्रामस्थाने या संदर्भात पोलिसांच्या 112 क्रमांकावर माहिती दिली. ही माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी रवाना झालो असे नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे म्हणाले. पोलीस पथक बुधवारी मध्यरात्री टाकळी जहागीर येथील मुक्ता बाभळे यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी घराची झडती घेतली. यावेळी त्या ठिकाणी एक अल्पवयीन मुलाला सोबत बसवून एक मांत्रिक त्या मुलाला गुप्तधन कुठे आहे असे सतत विचारताना आढळून आले. पोलीस आल्याचे लक्षात येताच मांत्रिक सुखदेव पाटोरकर हा घरातील बाथरूममध्ये लपला तर इतर सर्व जण पळून गेले. सुखदेवला अटक केल्यानंतर पळून गेलेल्या इतरांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले.
तो मुलगा शाळेच्या गणवेशात: गुप्तधन शोधण्याकरिता घरात पूजेसाठी ज्या पायाळू मुलाला आणण्यात आले होते तो मुलगा शाळेच्या गणवेशात होता. या मुलाला मांत्रिक व त्याच्या साथीदारांनी मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या मल्हारा या गावातून आणले होते, असे चौकशी दरम्यान समोर आले. पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी ही माहिती दिली.
पूजेचे साहित्य केले जप्त : पोलिसांनी मुक्ता भाबळे यांच्या घरातून पूजेसाठीची हळद, कुंकू, राख, लोखंडी सब्बल, चटईसह त्यावर लावलेला दिवा असे साहित्य जप्त केले.
अंधश्रद्धेला 'ईटीव्ही भारत' खतपामी घालत नाही.
हेही वाचा: