अमरावती - जिल्ह्यातील चिखलदरा, मेळघाटमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत आहे. त्यामुळे विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळख असलेल्या चिखलदऱ्याचे सौंदर्य अधिकच बहरले आहे.
ढग जेव्हा डोंगरमाथ्यावर जमिनीच्या लगत येतात तेव्हा ते काळे न दिसता पांढरे दिसतात आणि म्हणून त्याला सर्वसामान्य भाषेत धुके म्हटले जाते. पण खरेतर हे ढगच असतात. उन्हाचा आणि उष्णतेचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही.
हेही वाचा - जागतिक पर्यटन दिन विशेष : वैभवशाली वारसा असलेला अतुलनीय भारत !
पावसाळा आटोपल्यावर सुरू होतो 'ऑक्टोबर हीट'चा महिना. पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूंच्या स्थित्यंतरामधला हा काळ असतो. या दरम्यान ढगांचे आवरण नाहीसे झाल्याने आणि सूर्यकिरण थेट जमिनीवर पोहोचू लागतात व जमिनीतली उष्णता वाढते. जमिनीत मुरलेल्या पाण्याची वाफ व्हायला लागून हवेतला दमटपणा जास्त जाणवू लागतो. असेच ढग सध्या चिखलदऱ्यात दिसत आहे. सध्या विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळख असलेल्या चिखलदऱयाचे सौंदर्य अधिकच बहरले आहे, सौंदर्याने नटलेल्या चिखलदऱ्याची ही काही दृश्य.
हेही वाचा - महाराष्ट्रसह मध्यप्रदेशच्या सीमेवरील मुक्तागिरीचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी