अमरावती - मोर्शी मार्गावर माहुली जहागीर लगत भरधाव कारने ट्रॅक्टर वर जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त कारचा चुराडा झाला आहे. सोमेश प्रभाकर काळबेंडे (वय 26), प्रभाकर रामचंद्र काळबेंडे (वय 74) आणि राजमाता प्रभाकर काळबेंडे (वय 62, सर्व राहणार वरुड ) असे मृतांची नावे आहेत.
हेही वाचा - अमरावतीच्या भातकुली तालुक्यात 80 वर्षीय वृद्धाची डोक्यात लोखंडी रॉड मारून हत्या
या अपघातात सुरेंद्र दोदळक (वय,८) हा चिमुकला जखमी झाला आहे. वरद सोमेश काळबेंडे यांचा भाचा असल्याची माहिती मिळत आहे. कळबेंडे कुटुंब वरूड वरून अमरावतीकडे येत असताना त्यांच्या कारसमोर असणाऱ्या ट्रॅक्टरच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात कार थेट ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. अपघातानंतर माहुली जहागीर पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. अपघातात जखमी वरदला तात्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत्यू झालेल्या तिघांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले असून मृत काळबेंडे हे दोघेही सेवानिवृत्त शिक्षक असल्याची माहिती आहे.
हेही वाचा - वर्धा धरणाच्या मुख्य कालव्यात आढळला मृतदेह, स्थानिकांनी ठेवला बांधून