अमरावती - कोरोनामुळे मृत्यूदारात प्रचंड वाढ झाली आहे. कधी ११, कधी २२ कधी ३६ तर कधी ४५पर्यंत कोरोनाने दगवलेल्यांचा आकडा अमरावतीत समोर आला आहे. यासोबतच कोरोनाच्या धास्तीने आणि कोरोनातुन मुक्त झाल्यावर मृत्यूला कवटाळणाऱ्यांची संख्याही कमी नाही. अशा या वेदनादायी परिस्थितीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमीत जागा शिल्लक नसल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अगदी मारामार होत आहे. आपल्या स्मशानभूमीत कोरोनाने दगवलेल्यांवर अंत्यसंस्कार होऊ नये यासाठी स्मशानभूमीला चक्क कुलूप लावण्याचा प्रकार देखील समोर आला आहे. एकूणच सध्या स्मशानभूमीसाठी अगदी मरमर सुरू आल्याची वेदनादायक परिस्थिती अमरावतीत पाहायला मिळत आहे.
हिंदू स्मशानभूमीवर ताण
१९४४ साली जुन्या अमरावती शहराच्या परकोटाबाहेर लांब अंतरावर हिंदू स्मशानभूमी निर्माण करण्यात आली. सर्व सुविधांनी संपन्न असणाऱ्या या स्मशानभूमीत विद्युत दाहिनीची व्यवस्था आहे. दररोज दिवसाला चार ते पाच मृतदेहांवर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. मात्र गत वर्षभरावसून या स्मशानभूमीवरचा ताण वाढला आहे. सध्या दररोज ४० ते ५० मृतदेहांवर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहे. मध्यंतरी शंभरच्या जवळपस मृतदेहांवर याठिकाणी अंत्यसंस्कार झालेत. सद्या तर अंत्यसंस्कार करण्यासाठी अगदी मारामार होत आल्याचे याठिकाणी पाहायला मिळाले.
स्मशानभूमीबाहेरही पेटवली जात आहे मृतदेह
कोरिनाने दगावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यास तासंतास वाट पाहावी लागत आहे. कोरोनाने दगवलेल्या व्यक्तीचे मृतदेह घेऊन अंत्यसंस्कारासाठी तीन, चार तास वाट पाहत बसणारे नातेवाईक कंटाळून मृतदेहांवर चक्क स्मशानभूमीबाहेर नाल्याकठी मृतदेह पेटवत आहेत.
चिमणीतून काळा धूर आणि तारांवर लटकत आहे पीपीई किट
हिंदू स्मशानभूमीतील शवदाहिनी सतत धगधगत आहे. या शवदाहिनीतुन उंचावर गेलेल्या चिमणीतून काळा धूर सतत निघतो आहे. शवदाहिनीबाहेर कोरोनाने दगावलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना पीपीई किट मध्ये गुंडलेला मृतदेह बाहेर कडून त्यावर अंत्यविधी केला जात आहे. त्याहून गंभीर म्हणजे मृतदेहवरचे पीपीई किट लगतच्या तारांवर फेकून दिले जात असल्याने ते या ठिकाणी लटकलेले दिसत आहे.
परिसरातील नागरिकांची ओरड
स्मशानभूमी परिसराला लागून असणाऱ्या श्रीनाथवाडी, गडगडेश्वर या भागातील नागरिकांनी आता आम्हाला त्रास सहन होत नाही. रात्रंदिवस घराजवळ मृतदेह पेटत असून शहरातील इतर भागात असणाऱ्या स्मशानभूमीत मृतदेह न्यावेत आणि या स्मशानभूमीचा ताण कमी करावा अशी मागणी या परिसरातील रहिवाशांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
शंकर नगर येथील स्मशानभूमीला कुलूप
शहरातील मोठ्या स्मशानभूमीपैकी एक असणाऱ्या शंकर नगर येथील स्मशानभूमीत कोरोनाने दगावणाऱ्यांवर अंत्यसंस्कार करू नये अशी भूमिका घेत स्मशानभूमीची देखरेख करणाऱ्या सिंधू समितीने स्मशानभूमीला चक्क कुलूप लावून ठेवले आहे.
प्रशासन म्हणतं लवकरच पर्याय
मुख्य हिंदू स्मशानभूमीची परिस्थिती पाहता यावर पर्याय म्हणून विलास नगर, शंकर नगर, फ्रेजारपूरा या भागातील स्मशानभूमीत कोरोनाने दगवलेल्यांवर अंत्यसंस्कार केले जातील अशी व्यवस्था केली जाणार आल्याची माहिती महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. विलास नगर येथील स्मशानभूमीत दोन दिवसांपासून कोरोनाने दगावलेल्यांवर अंत्यसंस्कार करणे सुरू झाले आहे. याठिकाणी विद्युत दाहिनीची व्यवस्था लवकरच होणार असून यासाठी हालचाली सुरू झाल्या आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - राज्यातील विद्यापिठांच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार; उदय सामंत यांची घोषणा