ETV Bharat / state

#COVID 19 : ब्लाइंड वेल्फेअर सोसायटीची माजी विद्यार्थ्यांना मदत - अंध व्यक्ती

अमरावतीच्या डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात ब्लाइंड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने आज किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

मदत करताना
मदत करताना
author img

By

Published : Mar 28, 2020, 1:50 PM IST

अमरावती - कोरोनाच्या संकट काळात आपल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांना मदत म्हणून अमरावतीच्या डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात 'ब्लाइंड वेल्फेअर सोसायटी'च्या वतीने आज किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

ब्लाइंड वेल्फेअर सोसायटीची माजी विद्यार्थ्यांना मदत

डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी हे रेल्वेमध्ये विविध साहित्यांची विक्री करतात. सध्या रेल्वेसह सर्वच ठिकाणे बंद असल्याने अंध व्यक्ती अडचणीत आले आहेत. संचारबंदीत ठरलेल्या वेळेत अंध व्यक्तींना किराणा आणायला जाणे शक्य नाही. अशा परिस्थितीत डॉ. भिवापूरकर अंध विद्यालयातील ब्लाइंड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने माजी विद्यार्थ्यांना आज किराणा वाटला. यामध्ये अर्धा किलो तेल, तांदूळ, डाळ, पीठाचे वितरण करण्यात आले.

हेही वाचा - लॉकडाऊनचा फटका..! अमरावतीत भाजीपाला कचऱ्यात, नागरिकांसह शेतकरी हवालदिल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.