ETV Bharat / state

राजकारण पेटले; ममता पाठोपाठ भाजपवाल्यांचा नवनीत राणांना 'जय श्रीराम' - खासदार

जय श्रीराम या वाक्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप कार्यकर्त्यांनी ममतादिदीला जय श्रीराम लिहिलेली पोस्टकार्ड पाठवली होती. त्यापाठोपाठ आता नवनीत राणालाही जय श्रीराम लिहिलेली पोस्टकार्ड भाजप प्रवक्त्यांनी पाठवली आहेत.

नवनीत राणा
author img

By

Published : Jun 19, 2019, 11:13 AM IST

Updated : Jun 19, 2019, 10:57 PM IST

अमरावती - लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनी संसदेमध्ये भाजप खासदारांनी जय श्रीरामचे नारे लगावल्या प्रकरणी आक्षेप घेतला होता. या प्रकरणी आता भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी जय श्रीरामचा मजकूर लिहून खासदार नवनीत राणा यांना एक पोस्टकार्ड पाठवले आहे. त्यामुळे जिल्ह्यात जय श्रीरामवरून राजकारण पेटण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे.

संसद हे जय श्रीरामाचे अथवा कुठलेही धार्मिक घोषणा देण्याचे स्थळ नाही. जय श्रीरामाचे नारे द्यायचे असतील, तर ते मंदिरात द्या, असे नवनीत राणा यांनी म्हटले होते. त्यानंतर खासदार नवनीत राणांच्या या भूमिकेवर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले होते. तर अनेकांनी यांचे समर्थन केले होते.

राजकारण पेटले; ममता पाठोपाठ भाजपवाल्यांचा नवनीत राणांना 'जय श्रीराम'

खासदार नवनीत राणा यांच्या या भूमिकेवर भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी खासदार नवनीत राणा यांच्या नावे एक पत्र लिहीले. त्या पत्रात त्यांनी राम ही राष्ट्रीय अस्मिता आहे, म्हणूनच जय श्रीराम, अशा प्रकारचा मजकूर लिहिलेला आहे. सोबतच त्यांनी हे पत्र त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरही अपलोड केले आहे.

असा आहे पोस्ट कार्डमधील मजकूर

|| जय श्रीराम ||
मा. खा. नवनीतताई राणा
सस्नेह नमस्कार,
मर्यादा पुरूषोत्तम, धर्मरक्षक प्रभू श्रीरामचंद्र हे राष्ट्रपुरुष आहेत. भारतीय महावस्त्राचा उभा धागा "राम " आहे.
"राम" ही राष्ट्रीय अस्मिता आहे. म्हणूनच
जय श्रीराम

हा मजकूर आहे फेसबुकवर

अनेक वर्षांनंतर ममतादीदींना पोस्टकार्ड लिहावे असे वाटत होते. पण सवयच तुटलेली. ते राहून गेले. आता त्यांच्या पाठोपाठ पोस्टकार्ड म्हणजे पत्र लिहिण्याची संधी आपल्या नवनिर्वाचित खा. नवनीत भाभी यांनी दिली. भेटलो की राम राम, भोळा असेल तर भोलाराम, जन्मताना राम, मरताना राम, तात्पर्य हे की भारतीय भाव भावनांची भागीरथी म्हणजे राम ! म्हणूनच भारतात जय श्रीराम ! राष्ट्रीय अस्मिता म्हणून...
आणि हो, जो नही राम का - वो नही काम का !
एवढ्याचसाठी पत्रप्रपंच. कळावे, लोभ असावा !
अशा प्रकारचा मजकूर असलेले पत्र भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी खासदार नवनीत राणा यांना पोस्टच्या माध्यमातून पाठवले आहे.

Intro:भाजप प्रवक्त्यांनी पाठवले खासदार नवनीत राणांना
'जय श्रीराम' चे पोस्टकार्ड

'जय श्रीराम' वरून आता अमरावतीतही नवा वाद

अमरावती अँकर
अमरावती लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनी संसद मध्ये भाजप खासदारांनी जय श्रीराम चे नारे लगावल्या प्रकरणी आक्षेप घेतला होता.या प्रकरणी आता भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी जय श्रीराम चा मजकुर लिहून खासदार नवनीत राणा यांना एक पोस्टकार्ड डाक सेवेच्या माध्यमातून पाठवले आहे.त्यामुळे जिल्ह्यात श्रीरामा वरून राजकारन पेटण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे.

संसद हे जय श्री रामाचे अथवा कुठलेही धार्मिक घोषणा देण्याचे स्थळ नसुन जय श्री रामाचे नारे द्यायचे असेल तर ते मंदिरात द्या असे नवनीत राणा यांनी म्हटले होते. त्यानंतर खासदार नवनीत राणांच्या या भूमिकेवर नेटकर्यांनी नवनीत राणा यांना ट्रोल केले होते तर अनेकांनी यांचे समर्थन केले होते.
खासदार नवनीत राणा यांच्या या भूमिकेवर भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी खासदार नवनीत राणा यांच्या नावे एक पत्र लिहून त्या पत्र लिहून त्यात राम ही राष्ट्रीय अस्मिता आहे म्हणूनच जय श्रीराम अशा प्रकारचा मजकुर लिहून हे पोस्टकार्ड नवनीत राणा यांना पाठवले आहे.सोबतच त्यांनी हे पत्र त्यांच्या अधिकृत फेसबुक पेज वरही अपलोड करण्यात आले आहे.

असा आहे पोस्ट कार्ड मधील मजकूर
|| जय श्रीराम ||

मा. खा.नवनीतताई राणा
सस्नेह नमस्कार,
मर्यादा पुरूषोत्तम ,धर्मरक्षक प्रभू श्रीरामचंद्र हे राष्ट्रपुरुष आहेत.भारतीय महावस्त्राचा उभा धागा "राम " आहे.

"राम" ही राष्ट्रीय अस्मिता आहे. म्हणूनच
जय श्रीराम
--------------------------------------------
हा मजकूर आहे फेसबुक वर

अनेक वर्षांनंतर ममतादीदींना पोस्टकार्ड लिहावे असे वाटत होते. पण सवयच तुटलेली. ते राहून गेले. आता त्यांच्या पाठोपाठ पोस्टकार्ड म्हणजे पत्र लिहिण्याची संधी आपल्या नवनिर्वाचित खा. नवनीत भाभी यांनी दिली. भेटलो की राम राम, भोळा असेल तर भोलाराम, जन्मताना राम, मरताना राम, तात्पर्य हे की भारतीय भाव भावनांची भागीरथी म्हणजे राम ! म्हणूनच भारतात जय श्रीराम ! राष्ट्रीय अस्मिता म्हणून...
आणि हो, जो नही राम का - वो नही काम का !
एवढ्याचसाठी पत्रप्रपंच. कळावे, लोभ असावा !

अशा प्रकारचा मजुकर असलेले पत्र भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी खासदार नवनीत राणा याना पोस्ट च्या माध्यमातून पाठवले आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Jun 19, 2019, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.