ETV Bharat / state

भाजपचे शटर उघडा आंदोलन, पोलीस येताच दुकानं बंद - अमरावती भाजप न्यूज

सध्या महाराष्ट्रभर कोरोनामुळे निर्बंध घालण्यात आले आहेत. पण, अमरावतीत भाजपने शटर उघडा आंदोलन केले. मात्र, पोलिस येताच पुन्हा दुकानं बंद करावी लागली.

BJP
भाजप
author img

By

Published : Apr 9, 2021, 4:07 PM IST

अमरावती : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा बंद आहेत. अमरावती शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे भाजपने बंदला विरोध दर्शविला आहे. आज भाजपने शटर उघडा आंदोलन केले, शहरातील दुकानं उघडली. मात्र, पोलिसांच्या धाकाने व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकानं बंद केली.

जवाहर गेट परिसरात भाजप कार्यकर्ते एकत्र
राज्य शासनाच्या 'ब्रेक द चेन' विरोधात भाजपने गुरुवारी शटर उघडा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज (9 एप्रिल) सकाळी 11 वाजता जवाहर गेट परिसरात भाजपचे शहर अध्यक्ष किरण पातूरकर यांच्या नेतृत्वात सर्व कार्यकर्ते एकत्र आले. यावेळी जवाहर गेटसह मोची गल्ली, सरोज चौक, जवाहर गेटच्या आतील सक्करसाथ, सराफा बाजार परिसरातील दुकानं उघडा, असे आवाहन भाजप कार्यकर्त्यांनी केले.

भाजप मोर्चामागे पोलिसांचा ताफा

व्यापाऱ्यांनी दुकानं उघडावीत, असे आवाहन करीत भाजपचा मोर्चा जवाहर गेट, मोची गल्ली येथून निघाला. यावेळी काही व्यवसायिकांनी भाजप कार्यकर्त्यांच्या हातून आपली दुकानं उघडून घेतली. मात्र, भाजप कार्यकर्त्यांच्या मोर्चा मागून पोलिसांचा ताफा आला. त्यामुळे ज्या व्यवसायिकांनी जोमाने दुकानं उघडली, त्याच जोमाने पुन्हा दुकानं बंद केली. काही ठिकाणी भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बचबाचीही झाली.

हेही वाचा - "आधी भाजपचे नेते बोलतात, नंतर एनआयएकडून माहिती बाहेर येते; हा काय प्रकार?"

हेही वाचा - सोशल माध्यमांवर अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.