ETV Bharat / state

मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयात भाजपाचे आंदोलन, रेड्डी यांच्या निलंबनाची मागणी

हरीसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात आज भाजपाने आक्रमक भूमिका घेत, व्याघ्र प्रकल्प कार्यालतात आंदोलन छेडले आहे. अपर प्रधान उपवनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयात भाजपाचे आंदोलन

author img

By

Published : Mar 30, 2021, 3:23 PM IST

अमरावती - हरीसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात आज भाजपाने आक्रमक भूमिका घेत, व्याघ्र प्रकल्प कार्यालतात आंदोलन छेडले आहे. अपर प्रधान उपवनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रभारी अपर प्रधान मुख्यवनसंरक्षक प्रवीण चव्हाण आणि उपसंचालक खैरनार यांना दलनाबाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत भाजपा कार्यकर्त्यांनी वनाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडला.

प्रभारी अपर प्रधान उपवनसंरक्षक प्रवीण चव्हाण हे उपवनसंरक्षक खैरनार यांच्या दालनात पोहोचले तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी रेड्डी यांचे देखील निलंबन करण्यात यावे अशी त्यांच्याकडे मागणी केली. यावेळी प्रवीण चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांना कॉल करून रेड्डींविरोधात काही अहवाल असेल तर पाठवा अशी विनंती केली. मात्र यावेळी आक्रमक झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी हरी बालाजी यांच्यावर देखील आरोप केले. शिवकुमार यांना पोलीस कोठडीत अतिशय सन्मानाची वागणूक मिळत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

वनबल प्रमुख व्ही.साई प्रसाद यांच्या विरोधात घोषणाबाजी

प्रभारी अपर प्रधान उपवनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांच्या भ्रमणध्वनिद्वारे भाजपा प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी आणि भाजपा जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यान वनबल प्रमुख व्ही. साई प्रसाद यांच्याशी संवाद साधला, व त्यांना रेड्डीचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी केली. दरम्यान यावेळी व्ही. साई प्रसाद हे उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचा आरोप करून, भाजपाने त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयात भाजपाचे आंदोलन

पालकमंत्री, राज्यमंत्री बेपत्ता असल्याचा आरोप

जिल्ह्यात इतकी गंभीर घटना घडली असताना राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर आणि राज्यमंत्री बच्चू कडू कुठे बेपत्ता आहेत असा सवालही यावेळी निवेदिता चौधरी यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान या आंदोलनाच्या वेळी घटनास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दंग नियंत्रण पथक आणि अग्निशामक दलाला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.

हेही वाचा - दीपाली चव्हाणचे आणखी एका पत्र आले समोर, प्रकरणात आला नवा ट्विस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.