ETV Bharat / state

पालकमंत्र्यांच्या बैठकीत मंचावर महापौरांची खुर्ची नसल्याने भाजपने नोंदवला आक्षेप - पालकमंत्री यशोमती ठाकूर अमरावती

बैठकीत विषयांना सुरुवात होणार तोच भाजपचे नगरसेवक बाळासाहेब भुयार यांनी मंचावर महापौरांसाठी खुर्ची नाही. ते माझ्या बाजूला बसले आहेत. हे योग्य नाही, असे म्हणत रोष व्यक्त केला. दरम्यान, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नकळत अशी चूक झाली असेल, असे म्हणत महापौर चेतन गावंडे यांना मंचावर आमंत्रित केले.

पालकमंत्र्यांच्या बैठकीत मंचावर महापौरांची खुर्ची नसल्याने भाजपने नोंदवला आक्षेप
पालकमंत्र्यांच्या बैठकीत मंचावर महापौरांची खुर्ची नसल्याने भाजपने नोंदवला आक्षेप
author img

By

Published : Jan 25, 2020, 1:09 PM IST

अमरावती - पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज पहिली जिल्हा नियोजन बैठक घेतली. या बैठकीत मंचावर महापौरांसाठी खुर्ची नसल्यामुळे भाजपच्या सदस्यांसह आमदार सुलभा खोडके यांनी आक्षेप नोंदवला. यावेळी ठाकूर यांनी जिल्हा नियोजन भवनातील आपल्या कार्यालयाचे उद्घाटनही केले.

पालकमंत्र्यांच्या बैठकीत मंचावर महापौरांची खुर्ची नसल्याने भाजपने नोंदवला आक्षेप

सभा मंचावर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल विराजमान झाले. यावेळी प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, बडनेराचे आमदार रवी राणा आणि मूर्तीचे आमदार देवेंद्र भुयार यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, बैठकीत विषयांना सुरुवात होणार तोच भाजपचे नगरसेवक बाळासाहेब भुयार यांनी मंचावर महापौरांसाठी खुर्ची नाही. ते माझ्या बाजूला बसले आहेत. हे योग्य नाही, असे म्हणत रोष व्यक्त केला.

भाजपच्या सदस्यांनीही या प्रकाराबाबत विरोध करण्यास सुरुवात केली. यावेळी, आमदार सुलभा खोडके यांनीही जिल्हा परिषद अध्यक्षांना मंचावर स्थान मिळत असताना आमच्या शहराचे प्रतिनिधी असणाऱ्या महापौरांना मंचावर खुर्ची नसणे योग्य नाही, असे म्हणत आक्षेप नोंदवला. दरम्यान, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नकळत अशी चूक झाली असेल, असे म्हणत महापौर चेतन गावंडे यांना मंचावर आमंत्रित केले.

Intro:अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज घेतलेल्या जिल्हा नियोजनच्या पहिल्याच बैठकीत मंचावर महापौरांसाठी खुर्ची नसल्यामुळे भाजपच्या सदस्यांसह आमदार सुलभा खोडके यांनी आक्षेप घेतला.

Body:आज जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हा नियोजन भवनात आपल्या कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी कार्यालयात श्री गणेशासह दिवंगत माजी आमदार भैय्यासाहेब ठाकूर यांच्या प्रतिमेचे यशोमती ठाकूर यांनी पूजन केले. यानंतर जिल्हा नियोजन च्या सभेला सुरुवात झाली.
सभा मंचावर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल विराजमान झालेत. यावेळी प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, बडनेरा चे आमदार रवी राणा आणि मूर्तीचे आमदार देवेंद्र भुयार यांचे स्वागत करण्यात आले.
सभेच्या सुरुवातीला पालकमंत्र्यांनी उपस्थित सर्व सदस्य आणि अधिकाऱ्यांना' बेटी बचाव बेटी पढाव' यासाठी शपथ दिली.
दरम्यान बैठकीत विषयांना सुरुवात होणार तोच भाजपचे नगरसेवक बाळासाहेब भुयार यांनी मंचावर महापौरांसाठी खुर्ची नाही. ते माझ्या बाजूला बसले आहेत. हे योग्य नाही. असे म्हणत रोष व्यक्त केला. भाजपच्या सदस्यांनी या प्रकाराबाबत रोष व्यक्त करण्यास सुरुवात करतातच अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनीही जिल्हा परिषद अध्यक्षांना मंचावर स्थान मिळत असताना आमच्या शहराचे प्रतिनिधी असणाऱ्या महापौरांना मंचावर खुर्ची नसणे हे योग्य नाही असे म्हणत आक्षेप नोंदवला. दरम्यान पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नकळत अशी चूक झाली असेल असे म्हणत महापौर चेतन गावंडे यांना मंचावर आमंत्रित केले आणि बैठकीच्या विषयांना सुरुवातवात केली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.