अमरावती - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण भर्ती झाल्यामुळे रुग्णालयत बेडही उपलब्ध नाहीये. अशा वेळी होम क्वारंटाईन असलेल्या लोकांची प्रकृती धसळली तर त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. यासाठी राज्यभर ठिकठिकाणी कोविड ओपीडीची नितांत आवश्यकता असून यावर त्वरित निर्णय व्हायला हवा, अशी मागणी भाजपने केली आहे. याबाबत भाजप नेते डॉ. सुनील देशमुख आणि भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी शासनाला तसे निवेदन दिले आहे.
रुग्णांची मानसिकता आणि भीती समजून घेण्याची गरज
कोविडच्या दुसऱ्या लाटेत सध्या लोकांच्या मनात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह येताच कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले लोकं स्वतःला रुग्णालयात दाखल करून घेण्याचे प्रयत्न करतात. परिणामी ज्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे अशा रुग्णांना रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नाहीत. यात कोणत्याही रुग्णाची चूक नाही. मात्र, अशा अवस्थेत या रुग्णांची मानसिकता आणि भीती समजून घेणे गरजेचे असून यासाठी ओपीडी सेंटरची भूमिका महत्त्वाची आहे.असे शिवराय कुळकर्णी म्हणाले.
उपचार मिळणार नसल्याची भीती
आपली आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर आपल्यावर कोणी डॉक्टर उपचार करणार नाही, अशी भीती अनेक लोकांमध्ये आहे. यामुळे अनेकजण आजारी असतानाही कोविड टेस्ट करत नाहीत. मात्र, अशा रुग्णांची प्रकृती काही दिवसानंतर ढासळल्यावर वेळ निघून गेलेला असतो. अशा गंभीर विषयावर मात करण्यासाठी कोविड ओपीडी अत्यंत गरजेची ठरणार असेही शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्ट केले.
कोविड ओपीडीमुळे निर्माण होईल विश्वास
शहारत ठिकठिकाणी कोविड ओपीडी सुरू झाल्यास रुग्णांच्या मनात असणारी भीती दूर होईल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकाच कुटुंबतील सर्व बाधित होत आहेत.अशावेळी आपल्यावर उपचार करणारा डॉक्टर उपलब्ध आहे हा विश्वास निर्माण होईल. परिणामी कोरोना संक्रमण आटोक्यात आणण्यास या सर्व बाबीचा निश्चित उवयोग होईल, असा विश्वास शिवराय कुळकर्णी यांनी व्यक्त केला.
राज्यभरात कोविड ओपीडी सेंटर्स सुरू करा, भाजपची मागणी - bjp maharshtra latest news