ETV Bharat / state

अमरावती जिल्हा परिषदेत भाजप कार्यकर्त्यांचा धुमाकूळ, सोनियासह राहुल गांधींचे फोटो काढून फेकले - वीरेंद्र जगताप

भिंतीवर राष्ट्रपतींचा, पंतप्रधानांचा फोटो हवा. हे फोटो काय कामाचे असे म्हणत, भाजप कार्यकर्त्यांनी अध्यक्षांच्या दालनातील आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे फोटो काढून फेकले. या घटनेमुळे जिल्हा परिषद व परिसरात एकच खळबळ उडाली.

अमरावती जिल्हा परिषदेत भाजप कार्यकर्त्यांचा धुमाकूळ, सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे फोटो काढून फेकले
author img

By

Published : Jul 8, 2019, 8:40 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडुन जिल्हा परिषद अध्यक्षांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. भाजपचे अमरावती जिल्हा अध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून अध्यक्षांच्या दालनातील आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे फोटो काढून फेकण्यात आले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची प्रतिक्रीया

जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांना घेराव घालून विकास कामे का खुंटली? याबाबत जाब विचारण्यासाठी भाजप कार्यकर्ते जिल्हाध्यक्षांच्या दालनात शिरले. यावेळी जिल्हा अध्यक्ष नितीन गोंडणे बाहेर गेले होते. 'अमरावती जिल्हा परिषद अध्यक्ष निष्क्रिय आहेत. त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही.' असे म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात धुमाकूळ घातला. यावेळी भिंतीवर राष्ट्रपतींचा, पंतप्रधानांचा फोटो हवा, हे फोटो काय कामाचे असे म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी अध्यक्षांच्या दालनातील सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह चांदुर रेल्वेचे आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांचे फोटो कडून फेकले. या प्रकारामुळे जिल्हा परिषद आवारात खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच अध्यक्ष नितीन गोंडणे, आमदार वीरेंद्र जगताप आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख जिल्हा परिषदेत धावुन आले. भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रकाराचा बबलू देशमुख यांनी निषेध निंदविला. "जिल्हा परिषद अध्यक्षांनी त्यांच्या दालनात कोणाचे फोटो लावावेत हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. मंत्रालयात देखील जे लोक कुठल्याही पदावर नाहीत त्यांचे फोटो मंत्र्यांनी भिंतीवर लावले आहेत. भाजप आणि संघवाल्यांनी आधी ते फोटो काढावेत." असे बबलू देशमुख म्हणालेत.

Intro:( फोटो कडतानाचा विडिओ मेलवर पाठवतो. जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा बाईट बतमीसोबत आहे.)

जिल्हा परिषद अध्यक्ष निष्क्रिय आहेत. त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही असे म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात धुमाकूळ घातला. यावेळी अध्यक्षांच्या दालनात भिंतीवर लावलेले आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे फोटो काढून फेकले. या प्रकारामुळे अमरावती जिल्हा परिषदेत आज खळबळ उडाली.

Body:भाजपचे अमरावती जिल्हा अध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोर्चा आज जिल्हा परिषदेत धडकला. मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केल्यावर जिल्हा परिषद अध्यक्षांना घेराव घालून विकास कामे का खुंटली याबाबत जाब विचारण्यासाठी भाजप कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष नितीन गोंडणे यांच्या दालनात शिरले. यावेळी अध्यक्ष बाहेर गेले होते. अध्यक्षांच्या दालनात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह चांदुर रेल्वेचे आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांचा फोटो लागला होता. भिंतीवर राष्ट्रपतींचा , पंतप्रधानांचा फोटो हवा हे फोटो काय कामाचे असे म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी तीन्ही फोटो कडून फेकले. या प्रकारामुळे जिल्हा परिषद आवारात खळबळ उडाली. या प्रकाराची माहिती मिळताच अध्यक्ष नितीन गोंडणे, आमदार वीरेंद्र जगताप आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख जिल्हा पतिषदेत धावून आलेत. भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रकारचा बबलू देशमुख यांनी निषेध निंदविला. जिल्हा परिषद अध्यक्षांनी त्यांच्या दालनात कोणाचे फोटो लावावेत हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. मंत्रालयात जे लोक कुठल्याही पदावर नाहीत त्याचे फोटो मंत्र्यांच्या दालनात आहेत. भाजप आणि संघवाल्यांनी आधी ते फोटो काढावेत असे बबलू देशमुख म्हणालेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.