ETV Bharat / state

Birds Reproduction: पावसाळ्यात मेळघाटासह पोहरा जंगलात पक्षांचा विणीचा हंगाम सुरू, उत्तर भारतातून अनेक पक्षी दाखल - पक्षांचा पाळणा

उशिरा का होईना, परंतु आता संपूर्ण विदर्भात पाऊस चांगलाच बरसला आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच पावसाची वाट पाहणाऱ्या पक्षांमध्ये आनंद दरवळला आहे. पाऊस येताच पक्षांचा पाळणा देखील हलू लागला आहे. पाऊस बरसातच आपल्या पुढच्या पिढीच्या स्वागताची तयारी पक्षांनीदेखील केली आहे.

Birds Reproduction
पक्षांचा पाळणा हलला
author img

By

Published : Aug 6, 2023, 9:34 AM IST

प्रतिक्रिया देताना वन्यजीव प्रेमी आणि पत्रकार

अमरावती : निसर्गाचे चक्र हे संपूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. माणसांप्रमाणेच पक्षी देखील पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. नर्तक, सुगरण, शिंपी, वटवट्या, तीतर, मोर, नवरंग, पिवळ्या गालाची टिटवी, चातक, कोतवाल, शिरकीर, खंड्या, वेडा राघू, मल्कोहा, निळ्या शेपटीचा वेढा राघू, काश्मिरी नीलकंठ, नीलकंठ, हुदहुद ,राखी धनेश, मलबारी धनेश ,सुतार, चांडोल, अशा अनेक पक्षांचा हा विणीचा काळ आहे. उन्हाळा संपायला सुरुवात होऊन पावसाळ्याची चाहूल लागताच पक्षी घरटे बनवतात. बुलबुल, कस्तुर, कांचन, निळा शेपटीचा वेढा राघू हे पक्षी पोट खातात. नव्या पिढीला जन्म देण्यासाठी सज्ज होतात, अशी माहिती पक्षी निरीक्षक यादव तरटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

पावसाळ्यात पिलांसाठी भरपूर खाद्य : नवीन पिढी घडविण्यासाठी मादी आणि नराला भरपूर ऊर्जा लागते. अंडी दिल्यानंतर पिल्लांनादेखील भरपूर खाद्य भरवावे लागते. जून, जुलै महिन्यात पक्षी कपाच्या आकाराचे घरटे तयार करून त्यात अंडी घालतात. पाऊस आला की,अनेक सुप्तावस्थेतील कीटक, फुलपाखरे, नाकतोडे, कोळी, बेडूक मासे गांडूळ चतुर अशा अनेक कीटकांची व सजीवांची संख्या वाढते. त्यांच्या माध्यमातून पक्षांच्या पिल्लांसाठी भरपूर खाद्य निसर्गात उपलब्ध होते. त्यामुळे पक्षांना नव्या पिढीला घडविण्याचा हा अतिशय महत्त्वाचा काळ समजला जातो. पक्षांचे एकूण अस्तित्वच या पावसावर अवलंबून आहे.

नवरंग पक्षी मेळघाटात : पावसाळा लागतात उत्तर भारतातील नवरंग पक्षी मोठ्या संख्येने मेळघाटात दाखल होतात. हे पक्षी जंगलात नदी किंवा नाल्याच्या काठावर असणाऱ्या आडोशाच्या झाडाझुडपामध्ये घरटी करून त्यामध्ये अंडी देतात. मेळघाटप्रमाणेच पोहरा जंगलात देखील उत्तर भारतातील अनेक पक्षी स्थलांतर करून दाखल झाले आहेत. जातक पक्षी हा पोहरा जंगलात सध्या आढळत आहे. चातक पक्षाला रेन विजिटर असे देखील म्हणतात. अमरावती शहरालगत असणाऱ्या जंगलामध्ये पावशा या पक्षाचा 'पेरते व्हा', 'पेरते व्हा' किंवा 'पाऊस आला' असा संदेश देणारा आवाज सध्या येत आहे, अशी माहिती देखील यादव तरटे यांनी दिली.

पर्यावरणासाठी मान्सूनचे आगमन महत्त्वाचे : मान्सूनच्या आगमनामुळे जंगल हिरवेगार झाले आहे. गवत आणि नवीन पालवी यावर फुलपाखरे, कोळी आणि इतर कीटकांचे जीवन समृद्ध झालेले पाहायला मिळत आहे. पर्यायाने पक्षांना मोठ्या प्रमाणात खाद्य या वातावरणात उपलब्ध झाले आहे. जंगलातील जैवविविधता व अन्नसाखळी असेच तेथील परिसंस्था पावसाळ्यात संतुलित होते. शेती आणि अर्थकारण तसेच पर्यावरण संतुलनासाठी मान्सूनचे आगमन अत्यंत महत्त्वाचे आणि लाभदायी असल्याचे यादव तरटे म्हणाले.

पक्षांची काळजी घेऊन छायाचित्रण : जिल्ह्यातील अनेक पक्षी निरीक्षक हे सध्या पावसाळ्यातील पक्ष्यांचा विणीचा काळ आपल्या कॅमेरात टिपण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे आम्ही सारे वन्यजीव छायाचित्रकार पक्षांच्या अस्तित्वाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घेऊन छायाचित्रण करतो, असे वन्यजीव छायाचित्रकार डॉ. तुषार अंबडकर 'ई टीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. पक्षी सहसा आपली घरटीही कोणालाही दिसणार नाही, अशा झुडपात तयार करतात. अनेकदा आम्ही झुडपाप्रमाणे वेश परिधान करून पिलांना घास भरविणाऱ्या पक्षांचे छायाचित्रण करतो. एकूणच पक्षांचे कुठलेही नुकसान होणार नाही, याला छायाचित्रणापेक्षा अधिक प्राधान्य दिल्या जात असल्याची खंतदेखील डॉ. तुषार अंबाडकर म्हणाले.

हेही वाचा :

  1. Little Green Bee Eater : उन्हाळ्यात आला निळ्या शेपटीचा पाहुणा; जाणून घ्या कसा आहे मनाला वेड लावणारा वेडा राघू पक्षी
  2. National bird day 2023 : राष्ट्रीय पक्षी दिवस का साजरा केला जातो; त्याचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या
  3. Coppersmith Barbet Bird: पानगळतीत तांबट पक्ष्याचं ठाण्यात दर्शन; टूक टूक आवाजाने वेधले लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.