ETV Bharat / state

अमरावतीत बर्ड फ्लूची धास्ती : मागणी घटल्याने कोंबडी तसेच अंड्यांच्या दरात घसरण

अमरावतीच्या बडनेरा येथील चाळीस कोंबड्या या दोन दिवसांपूर्वी दगावल्या आहे. परंतु त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणे बाकी आहे. दरम्यान बर्ड फ्लू आल्याची चर्चा असल्याने चिकन आणि अंड्यांच्या मागणीत घट झाली आहे.

Bird flu scare hits chicken consumption, sales in amravati
बर्ड फ्लूची धास्ती : अमरावतीत मागणी घटल्याने कोंबडी तसेच अंड्यांच्या दरात घसरण
author img

By

Published : Jan 11, 2021, 9:47 AM IST

अमरावती - देशातील चार राज्यांमध्ये बर्ड फ्लू संकट असतानाच आता राज्यातही अनेक ठिकाणी कोंबड्या दगावत आहेत. अमरावतीच्या बडनेरा येथील चाळीस कोंबड्या या दोन दिवसांपूर्वी दगावल्या आहे. परंतु त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणे बाकी आहे. यादरम्यान बर्ड फ्लू आल्याची चर्चा असल्याने चिकन आणि अंड्यांच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे अंड्याच्या आणि चिकनच्या दरात अमरावतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आधीच देशावर कोरोनाचे सावट असताना आता पुन्हा बर्ड फ्लूचे संकट हे घोंगावत आहे. सुरुवातीला कोरोना हा कोंबड्यामुळे होत असल्याची अफवा पसरल्यामुळे पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यातून पोल्ट्री व्यवसायिक हे हळूहळू सावरत असतानाच आता बर्ड फ्लू आल्याची अफवा पसरत असल्याने पुन्हा एकदा हा व्यवसायासमोर संकट उभे राहिले आहे.

अधिक माहिती देताना आमचे प्रतिनिधी...
आठ दिवसांपूर्वी १६० ते १७० रुपयेपर्यंत विकला जाणारा अंड्याच्या ट्रेची किंमत आता १३० रुपयांपर्यंत येऊन ठेपली आहे. तर चिकन व्यवसायालाही याचा जबर फटका बसला आहे. २०० रुपये किलो विकले जाणारे चिकन आता १५० ते १७० रुपयांमध्ये बाजारपेठेत मिळत आहे. राज्यात अद्यापही बर्ड फ्लू नसला तरी बर्ड फ्लूच्या भीतीमुळे मात्र पोल्ट्री व्यवसायाला फटका बसत आहे.

हेही वाचा - भरधाव वाळू ट्रकची आयशर ट्रकला धडक; सुदैवाने जिवितहानी नाही

हेही वाचा - अमरावती : दोन दिवसात 40 कोंबड्या दगावल्या, बर्ड फ्लूची भीती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.