अमरावती : महाराष्ट्र पोलीस भर्तीमध्ये उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करू शकत नाही ही लावण्यात आलेली अट रद्द करावी, या मागणीसाठी भीम आर्मी ही संघटना आक्रमक झाली आहे. ही अट रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
ही अट रद्द करण्याची मागणी - संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या १८,३३१ पदाकरीता विविध जिल्ह्यामध्ये पोलीस भर्ती प्रक्रीया राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेचे भीम आर्मीने स्वागत केले आहे. पण उमेदवाराने फक्त एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करू नये ही जाचक अट लादली आहे. ही अट भरती मध्ये सामील होऊ इच्छिाऱ्यांसाठी जाचक आणि कठीण आहे.
सरकारला निवेदन सादर - सर्व सामान्य जनतेचा तीव्र विरोध आहे. कारण एका व्यक्तीने एका ठिकाणी अर्ज भरल्यास भरती प्रक्रिया चालू असतांना किंवा शारिरीक चाचणी चालू असतांना उमेदवाराला काही ये जा करते वेळी उदाहरणार्थ उमेदवाराने अमरावतीला अर्ज भरला किंवा इतर कोणत्या गावी अर्ज भरला तो तेथे पोहचण्यास काही अडचण आली, तर त्याचे पूर्ण वर्ष वाया जाते व भरती प्रक्रिया शारिरीक चाचणी चालू असतांना उमेदवारांकडून काही चुक झाल्यास त्याचा एका ठिकाणाहून अर्ज नाकारण्यात आला. तरी त्याचे पूर्ण वर्ष वाया जाते. याकरीता त्यांचे मनोबल न तुटावे व त्यांच्या जिवनात नैराश्याचे वातावरण न तयार व्हावं यासाठी व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र सरकारला निवेदनातून भीम आर्मी संघटनेने विनंती केली आहे.
आंदोलनाचा इशारा - उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करू शकत नही ही अट रद्द करण्यात यावी. येत्या दोन दिवसात यावर निर्णय न झाल्यास भिम आर्मी कडून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. ही अट नामंजूर झाली नाही तर होणाऱ्या आंदोलनास महाराष्ट्र सरकार व गृहमंत्री देवेंद्र फडवणीस जबाबदार असतील.